सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

"इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत"- भाजपा नेते निलेश राणे

"राष्ट्रवादीत चाललंय काय?"

Sudarshan MH
  • Jan 15 2021 12:52PM

धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेली अटक यामुळे भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विरोधक वारंवार धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप गंभीर असून पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे. तर नवाब मलिक यांच्यावर थेट आरोप नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केली आहे. यादरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेल मध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला लगावला आहे.

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काय चाललंय महाराष्ट्रात? मुंबईचे सहपोलिस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतो. अशाने पोलिसांवरील विश्वास उडेल लोकांचा… सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं”.

निलेश राणे यांनी यावेळी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यावर झालेल्या कारवाईचं श्रेय नरेंद्र मोदींना दिलं आहे. “मोदी साहेबांमुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्जच्या लफड्यात पकडला गेला,” असं त्यांनी म्हटलं आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार