सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आज राज्यभर भाजपचं आंदोलन

मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजप आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे

Aishwarya Dubey
  • Aug 29 2020 10:03AM

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर वाढला असला तरी कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. अशात आता राज्य अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी जोर धरला जात आहे. मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भाजप आज राज्यभरात घंटानाद आंदोलन करणार आहे. पुण्यात आज दोन ठिकाणी हे घंटानाद आंदोलन होतं आहे. सारसबाग आणि ओंकारेश्वर मंदिराबाहेर भाजप कार्यकर्ते एकञ जमणार आहेत. सकाळी 10 वाजता सारसबाग तर 11 वाजता ओंकारेश्वर मंदिरात घंटानाद होणार असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईतही भाजप आंदोनलन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर सिद्धीविनायक मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तं तैनात करण्यात आला आहे. भाजपच्या घंटानाद आंदोनामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते सिद्धीविनायक मंदिराबाहेर निदर्शने करणार आहेत. त्यामुळे सिद्धीविनायक मंदिरा बाहेर पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.

दरम्यान, ज्यात धार्मिक स्थळं मंदिरं आणि जीम सुरू करण्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत. राज्यातील मंदिरे आणि जीम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही संजय राऊत यांनी गुरूवारी स्पष्ट केलं आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्यातील धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच भाष्य केलं आहे. माझ्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धार्मिकस्थळं आणि जीम सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असं राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे गणेश विसर्जनानंतर राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार