सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पार्थ टोकाची भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित

पार्थ टोकाची भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यावर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Aishwarya Dubey
  • Aug 17 2020 8:51AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याला सार्वजनिकरित्या फटाकरल्यानंतर पार्थची पक्षावर नाराजी या सगळ्या वादंगात पार्थ पवार मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पार्थ टोकाची भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. पण यावर भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

'पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही' असं स्पष्ट सांगून त्यांनी चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला. पार्थ भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेत नाही असं गिरीष बापट म्हणाले आहेत. हा त्यांचा कौटुंबिक वाद आहे. आपण त्यात फार पडू नये. त्यांनी तो घरातच सोडवावा असं यावेळी बोलताना गिरीष बापट म्हणाले.

खरंतर पार्थ पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर नाराज होते. त्यामुळे ते मोठी भूमिका घेत भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात होतं. पण गिरीष बापट यांनी या चर्चेला पूर्णविऱ्हाम दिला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कानउघडणी केल्यामुळे पवार कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वादंग सुरू होता. पण आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नातू पार्थ पवार यांच्यातील वाद निवळला असल्याची मोठी माहिती सूत्रांकडून देण्यात आहे. आज बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटुंबाची बैठक पार पडली. याबैठकीमध्ये आजोबा-नातवाच्या वादंगावर अखेर पडदा पडला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार