सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन

आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. कुठे महागठबंधन आघाडीवर होते तर कधी एनडीएने आघाडी घेतली.

Aishwarya Dubey
  • Nov 10 2020 4:31PM

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आघाडीच्या निकालानंतर आता विजयी निकालाची बातमी समोर आली आहे. एनडीएने  22 जागांवर विजय मिळवला आहे. तर जदयूने 6 जागांवर आणि भाजपने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 10 जागा जिंकल्या आहेत.

भाजपने पहिला विजय हा दरभंगातील केवटी मतदारसंघातून मिळवला आहे.  भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकीचा पराभव केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या जागा आता विजयात रुपांतरीत झाल्या आहे. आतापर्यंत भाजपने 16 जागा जिंकल्या आहेत.  भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडयू 46 जागांवर आघाडीवर आहे.

आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. कुठे महागठबंधन आघाडीवर होते तर कधी एनडीएने आघाडी घेतली होती. पण, दुपारी 12 वाजेनंतर चित्र हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एनडीएने सर्वाधिक 124 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 122 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे.

 

तर राजद महागठबंधनला 109 जागावर आघाडीवर आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 2 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. एकटा भाजपने सर्वाधिक 71 जागांवर मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 53 जागा आल्या होत्या. तर नितीशकुमार यांच्या जदयूला 71 जागा मिळाल्या होत्या. पण, आता जदयूची घसरगुंडी झाली असून 47 जागांवर आघाडीवर आहे.  त्यामुळे भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्यामुळे नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे.

जदयूचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी सांगितले की, 'कोणत्याही पक्षाच्या जास्त जागा आल्या तरी मुख्यमंत्री हे नितीशकुमारच होतील.'

बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री हे नितीशकुमारच असणार आहे. भाजपने निवडणूक जिंकली आहे. काँग्रेस पक्ष हा संपुष्टात येत आहे. गावागावात, शेतकऱ्यांनी मोदी यांना पसंती दिली आहे. महिला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे.  80 कोटी लोगांना रेशन मिळाले आहे, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित होता, असंही सिंह म्हणाले.

निवडणूक प्रचारात विरोधकांनी खरे मुद्दे न मांडता खोटा प्रचार केला होता. नितीश कुमार यांनी बिहारला ऊर्जा देण्याचे काम केले आहे. जंगलराज मुक्त बिहार केलं आहे, असं सिंह म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार