सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आधी चर्च, मस्जिद व गांधी परीवाराची संपत्ति दान द्या, नंतर मंदिरा बद्दल बोला

आपण ज्या विषयाला तोंड फोडले आहे, त्यामुळे आता मला माझ्या हिंदू बांधवांना बरीच सत्ये समजावून सांगण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल मी आपला ऋणी आहे.

Sujeet Bhogle
  • May 14 2020 2:36PM
आपण ज्या विषयाला तोंड फोडले आहे, त्यामुळे आता मला माझ्या हिंदू बांधवांना बरीच सत्ये समजावून सांगण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल मी आपला ऋणी आहे. 

सगळ्यात पहिला मुद्दा. आपण मागणी केली आहे की भारतातील मंदिरात ७६  लाख कोटी रुपयांचे सोने पडून आहे सरकारने ते १ किंवा २ % व्याजाने ताब्यात घ्यावे. 

महोदय, आपण अर्धवट आणि अपमानास्पद मागणी केली आहे. आपल्याला हिंदूंची दानत किती आहे याची कल्पनाच नाही. 

आमच्या संस्कृतीमध्ये एक तिळ सात जणांनी वाटून खाण्याचे दाखले आहेत

आमच्या संस्कृती मध्ये दुष्काळात भुकेने व्याकूळ झालेल्या कुटुंबाने अतिथीला आपल्या वाटणीचा भात देताना सर्वांनी प्राणत्याग केल्याचे उदाहरण आहे. 

त्यामुळे मी सुधारित मांडणी करतो आहे आपण सरकारला तशी विनंती कराल ही अपेक्षा. 

आपण माजी मुख्यमंत्री आहात. पंतप्रधान कार्यालयातील मुख्य अधिकारी होता. महान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहनसिंग यांचे शिष्य आहात. त्यामुळे आपल्याला कशाचेही मुल्यांकन करताना अर्धवट करू नाही हे माहिती असेलच. परंतु आपण केवळ मंदिरातील सोने मोजले. असे करू नका. 

मंदिरांच्या संपूर्ण स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मुल्यांकन करा. रोख रक्कम किती आहे ही माहिती घ्या आणि मग त्यात या सोन्याला , चांदीला आणि अन्य मूल्यवान धातू आणि रत्नांना सुद्धा जोडा. त्या निमित्ताने आम्हा हिंदूंना आमचे देव किती संपत्ती बाळगून आहे हे पण कळेल आणि जगाला सुद्धा शेकडो वेळा लुटून सुद्धा हिंदूंची काय ताकद आहे ते कळेल. 

हे जे मूल्य येईल हे माझ्या ढोबळ अंदाजानुसार १० कोटी कोटी रुपये तरी नक्की येईल. 

आणि 

तमाम हिंदूंच्या, हिंदू मंदिरांच्या विश्वस्तांच्या आणि आमच्या शंकराचार्यांच्या वतीने मी आपल्याला आश्वासन देतो या विपत्तीच्या क्षणी व्याज घेण्याच्या इतके सुद्धा आम्ही नीच नाहीत.. आम्ही आमच्या मंदिरांच्या संपत्तीच्या एकूण मूल्यांकनाच्या १० % रकमेच्या इतकी रक्कम रोख आणि सोने स्वरूपात सरकार ला दान करायला तयार आहोत. 

अर्थात १ कोटी कोटी रुपये. आपल्या पंतप्रधानांनी घोषित केलेल्या package च्या दहापट. 

पण 

त्याच वेळी मला आपल्याला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे. या देशातील संविधानाच्या अनुसार समानता आहे असे म्हणतात. 

आपण, आपले लाडके नेते आणि पक्ष या समानतेचा वारंवार उद्घोष करतात. तर याच समानतेचा वारसा आपण यापुढे चालवूया. 

ज्या प्रमाणे मंदिरांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे आपण मुल्यांकन करतो आहे त्याच प्रमाणे आपण मशिदी आणि  चर्च चे सुद्धा मुल्यांकन करुया. स्तूप, गुरुद्वारा आणि जैन मंदिरांचे वेगळे मुल्यांकन करण्याची गरज नाही कारण त्या आमच्या हिंदू धर्माच्याच शाखा आहेत. 

आणि 

ज्या प्रमाणे आम्ही आमच्या संपत्तीपैकी १० % सरकार ला आनंदाने दान करतो आहोत त्याप्रमाणे चर्च आणि मशिदींची सुद्धा १० % संपत्ती सरकारला दान होऊ दे. 

आमची दानत आहे आणि ती कायम राहणार आहे. चर्च आणि मशिदींची सुद्धा आहे का हे तर एकदा बघुया... काय हरकत आहे ??? 

हा झाला पहिला मुद्दा. 

आता दुसऱ्या मुद्द्याच्या कडे वळूया. 

ज्याप्रमाणे आपण मंदिरांनी सोने द्यावे ही मागणी केली आहे त्याच प्रमाणे माझी सुद्धा एक मागणी आहे. या देशातील तमाम राजकीय पक्ष हे सुद्धा या देशाचाच एक भाग आहेत. सतत जनतेच्या सेवेत रत असणाऱ्या राजकीय पक्षांच्या कष्टांची आम्हा सर्वसामान्य लोकांना कल्पना आहे. परंतु ही सेवा करता करता राजकीय पक्षांच्या कडे सुद्धा निधी आणि अन्य स्वरूपात पैसा आणि मालमत्ता जमा होत असते. 

या निमित्ताने माझी सन्माननीय राष्ट्रपती महोदय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि आपल्या तर्फे तमाम राजकीय पक्षांना विनंती आहे की आपण आपल्या सुद्धा स्थावर आणि जंगम मालमत्तेचे मुल्यांकन करून ते मूल्य किती आहे हे घोषित करावे. 

प्रत्येक राजकीय पक्षांच्या या मालमत्तेचे जे मुल्यांकन होते आहे त्याच्या १० % रक्कम सगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा सरकारला दान करावी. त्या निमित्ताने या देशातील राजकीय पक्षांची दानत काय आहे ते सुद्धा जनतेला समजून येईल. 

कारण या आपत्तीच्या क्षणी कोणत्याही नामचीन नेत्याने आपल्या खिशात हात घातल्याचे या देशाच्या जनतेने पाहिले नाही. 

राजकीय पक्षांच्या मालमत्तेचे मुल्यांकन केल्यावर जनतेला हे सुद्धा समजेल की गरिबी हटावी म्हणून रात्रंदिवस काम करणारे राजकीय पक्ष मात्र जादू केल्या प्रमाणे कसे श्रीमंत होत आहेत.     

तुम्ही हिंदू आणि हिंदूंच्या मंदिरांची दानत बघण्याचा विचार करत आहात ना ? तर या निमित्ताने अन्य धर्मीयांची आणि राजकीय पक्षांची दानत सुद्धा सामान्य जनतेला दिसू दे की, काय हरकत आहे ?? 

हिंदूंची मंदिरे नक्कीच आपली संपत्ती सरकार ला गरज पडली तर दान करतील. आनंदाने करतील. कृतार्थ होऊन करतील. 

पण

आता संविधानात समानता असल्याने फक्त आम्ही करणार नाहीत. आमच्या बरोबर अन्य धर्माची मंडळी सुद्धा करतील. 

आता संविधानात समानता असल्याने फक्त धार्मिक संस्था करणार नाहीत आमच्या बरोबर राजकीय पक्ष सुद्धा करतील. 

बोला. आहे का हिम्मत ??? 

तळटीप : आपल्या राजकीय पक्षांचा हिंदू द्वेष, आपल्या मंदिरातील असलेल्या संपत्तीचा लोभ हा वारंवार आणि सर्व प्रकारे प्रकट होत असतो. एरवी आपण प्रत्युत्तर देत नाही. या वेळी मात्र मी मुद्देसूद प्रतिवाद केला आहे. या निमित्ताने आपल्याला राजकीय पक्षांच्या पंचाला सुद्धा हात घालण्याची संधी मिळते आहे. हिला गमावू नका. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे हा लेख सर्वत्र व्हायरल करा. प्रत्येक न्यूज च्यानेल पर्यंत पोचवा.

 प्रत्येक राजकीय पक्षाच्या पर्यंत पोचवा. याच्यावर चर्चा होऊच दे. कोण किती पाण्यात आहे आपोआप कळेल. 

सुजीत भोगले
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

अभी अभी