सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राजस्थान : लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांनी सरकारी शाळेचा केला कायापालट

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत.

Sudarshan MH
  • Apr 22 2020 6:06PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. स्थलांतरित झालेले मजूर देखील कामाच्या ठिकाणी अडकून पडले आहेत. राजस्थान मधील सिकर गावात अडकलेल्या संधीचा सदुपयोग करत देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. 


राजस्थान मध्ये मजदुरीवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या भरपूर आहे. लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या या सर्व मजुरांची व्यवस्था गावातील दोन शाळांमध्ये करण्यात आली. राहण्याच्या सुविधेबरोबरच त्यांच्या जेवणाची सोय देखील केली होती. 

या संकट काळात आपल्या पाठीशी उभे राहणाऱ्या गावासाठी काही तरी करायचे असे ठरवून आपण राहत असलेली शाळा रंगवून देण्याचे ठरवले आणि गावकऱ्यांकडे रंग आणि इतर साहित्याची मागणी केली आणि हे मजदुर तेथे राहून आता शाळा रांगवण्याचे काम करत शाळेला नवी कोरी आणि चकचकीत बनवून टाकले आहे. 

या गोष्टीचे प्रशासनाने देखील कौतुक केले आहे. नुकतेच या भागात पाहणीसाठी आलेल्या जिल्हा प्राधिकरणाच्या सचिवांनी या कामाचे कौतुक करत हे काम अन्य केंद्रांसाठी रोल मॉडेल असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान, या बाबत आपली भावना बोलताना शाळेच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या मजुरांनी हे काम आपल्या खांद्यावर घेतल्याने शाळेचा मोठा प्रश्न सुटला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कामाचे पैसे ही घेण्यास मजुरांनी नकार दिला आहे. या प्रकारे मजुरांनी एक आदर्श घालून दिला आहे. 

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
1 Comments

टेस्ट

  • Guest
  • May 16 2020 4:36:35:130PM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार