सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्य सरकारनं केंद्रसरकारकडं मुंबई लोकल सुरू मागणी

मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राज्य सरकार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत.

Snehal Joshi .
  • Oct 4 2020 11:25PM
अनलॉक'चा पाचवा टप्पा उद्यापासून सुरू होणार असून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडणार आहेत. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. 'राज्य सरकारनं मागणी केल्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ,' असं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. करोनाच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं 'पुनश्च हरिओम' केले आहे. टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वांना प्रतीक्षा आहे ती मुंबई लोकलची. मुंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राज्य सरकार ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मुंबई लोकल सुरू करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात राज्य सरकारनं अद्याप केंद्र सरकारकडं याबाबत कुठलीही मागणी केलेली नाही, असं पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार