सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नारायण राणेंच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शाह उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार....

कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर ....

Sudarshan MH
  • Feb 6 2021 12:57PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या रविवारी सिंधुदुर्गात येणार आहेत. भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अमित शाह सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.

कुडाळा तालुक्यातील पडवी गावात खासगी ७० एकर जमिनीवर चार वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात केली होती. मागच्या सात दशकांपासून सिंधुदुर्ग जिल्हा चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून वंचित असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

खरंतर आज सहा फेब्रुवारीला अमित शाह यांच्या हस्ते रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन होणार होते. पण शेतकऱ्यांनी आज देशभरात चक्का जाम आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नियोजित कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता उद्या हा उद्घाटन सोहळयाचा कार्यक्रम पार पडणार आहे. एसएसपी वैद्यकीय रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली. नारायण राणे राज्यसभेत भाजपाचे प्रतिनिधीत्व करतात. कोकणातील वजनदार नेते अशी त्यांची ओळख आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग सहावेळा निवडणूक जिंकली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार