सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जगप्रसिध्द अजिंठा वेरुळच्या लेणी 8 महिन्यानंतर पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज

प्रति दिवस केवळ 2 हजार पर्यटकांनाच लेणी पाहण्यासाठी प्रवेश देणार

Abhimanyu
  • Dec 10 2020 1:08PM

संभाजीनगर :  गेली आठ महिन्यापासुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल होत. या लॉकडाऊन नंतर केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉकच्या प्रक्रियेत अटी-शर्थींसह टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी सुरु करण्याची परवाणगी दिली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली होती. मात्र आता सरकार कडून पर्यटन स्थळंही सुरु करण्यास परवागी देण्यात आली आहे. अशातच तब्बल 8 महिन्यांपासून बंद असलेली औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं आजपासून सुरु करण्यात आली आहेत.



यामुळे आता पर्यटकांची प्रतिक्षा संपली असुन तब्बल 8 महिन्यानंतर लेण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. मास्क आणि सोशल डिस्टान्सिंगसह इतर सुरक्षेच्या उपाययोजनांची काळजीही पर्यटकांना घ्यावी लागणार आहे. काल अजिंठा येथे अजिंठा पर्यटन केंद्र परिसरात लेणीमध्ये प्रवेश कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला होता. आणि त्यानंतर पर्यटन प्रसासनाच्या वतिने लेण्यांच्या परीसराची स्वच्छता करण्यात आली.



लेण्या पाहण्यासाठी मर्यादित पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार असुन  त्यासाठी प्रति दिवस केवळ 2 हजार पर्यटकांनाच लेणी पाहण्यासाठी प्रवेश देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार असुन  त्यासाठी पर्यटकांना केवळ ऑनलाइन किंवा क्यूआर बेस तिकिटांची नोंदणी करावी लागणार आहे. पर्यटक पर्यटन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन तिकीट नोंदणी करु शकतील. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल

 

पर्यटनस्थळे सुरळीतपणे सुरू ठेवण्यात प्रशासनासह टुरिस्ट गाईडची जबाबदारी व भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरची सुविधा संबंधित यंत्रणेने उपलब्ध करून द्यावी. तसेच पर्यटनस्थळी आरोग्य यंत्रणेने व पोलिस विभाग यांनी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहुन पर्यटकांना कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची काळजी घ्यावी. वेरूळ अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार