सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कट्टरपंथीयांची मुजोरी; हिंदुंच्या घरांवर हल्ला, मंदिरातील मूर्तींचीही तोडफोड

बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील अल्पसंख्याक हिंदूंच्या घरावर आणि मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Aug 9 2021 11:31AM

गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील भोंग शहरातील एका गणपती मंदिरावर काही समाजकंठकांनी हल्ला केला होता. जवळपास 150 हून अधिक जणांच्या जमावानं या मंदिरावर हल्ला करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. हे प्रकरण ताजं असताना आता बांगलादेशातही कंट्टरपंथीयांची मुजोरी समोर आली आहे. बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील अल्पसंख्याक हिंदूंच्या घरावर आणि मंदिरावर हल्ला करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, जमावानं मंदिरांमध्ये बसवलेल्या मूर्तींची तोडफोड केली आहे. यासोबतच हिंदू लोकांच्या घरांवरही हल्ले केले आहेत. खुलना जिल्ह्यातील शियाली, मल्लिकपुरा आणि गोवर गावांमध्ये शेकडोच्या संख्येनं आलेल्या जमावानं परिसरातील सहा मंदिरांवर हल्ला केल्याचं सांगण्यात आलं आहे. एवढेच नाही तर कट्टरपंथीयांनी मंदिरांच्या मूर्तींचंही बरंच नुकसान केलं आहे. हल्लेखारांनी संबंधित गावातील 57 हून अधिक हिंदू कुटुंबांना टार्गेट केलं आहे. तसेच शियाली गावातील हिंदू समाजाच्या 6 दुकानांचीही तोडफोड केली आहे.

शुक्रवारी, रात्री नऊच्या सुमारास महिला भाविकांच्या एका समूहानं पूर्वा पारा मंदिरापासून शियाली स्मशानभूमीपर्यंत एक मिरवणूक काढली होती. दरम्यान वाटेतील एका मशीदीपासून मिरवणूक जात असताना, मशिदीच्या इमामनं मिरवणुकीला विरोध केला. यामुळे हिंदू भक्त आणि इस्लामिक मौलवींमध्ये जोरदार वादावादी झाली. यातूनच हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे. पण वृत्तसंस्था IANS नुसार, एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ही घटना शनिवारी दुपारी घडली, त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार