सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एसी लोकल सुरू झाली हो!

पश्चिम रेल्वेवर अशा लोकल्स आधीच सुरू झाल्या आहेत. प्रतिक्षा होती ती मध्य रेल्वेची. आता येणारा उन्हाळा मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांसाठी सुखद ठरणार आहे

Sudarshan MH
  • Dec 17 2020 11:02AM

गेल्या 9 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे (Mumbai Local) दार बंदच आहे. पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल (Ac Local) सुरू झाली आहे.

मुंबईतल्या लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना त्रासदायक ठरलाय. हा प्रवास थोडासा सुखद व्हावा यासाठी आता AC लोकल्स सुरू झाल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर अशा लोकल्स आधीच सुरू झाल्या आहेत. प्रतिक्षा होती ती मध्य रेल्वेची. आता येणारा उन्हाळा मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांसाठी सुखद ठरणार आहे.

 

 

 

आज सकाळी कुर्ला स्थानकावरून पहिली एसी लोकल पहाटे सुरू झाली आहे. कुर्ला स्थानकावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे पहाटे 5.42 वाजता पहिली लोकल रवाना झाली आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकादरम्यान 10 एसी लोकल चालवण्यात येणार आहे.

सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकल सेवा ही सोमवार ते शनिवार सुरू राहणार आहे. एसी लोकल ही धीम्या मार्गाने धावणार आहे, त्यामुळे ती सर्वच स्थानकावर थांबणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून लोकलने प्रवास करण्यास मुभा आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे परवानगी असेल असा प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करता येणार आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार