सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैभवशाली आणि ज्ञानी होण्यासाठी ; पाहा पाच नियम

आचार्य चाणक्य हे एक कुशल राजनीतिज्ञ, चतुर कूटनीतिज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्यंचे नियम आजही जीवनात तंतोतंत लागी पडतात

Sudarshan MH
  • Apr 12 2021 12:24PM

आचार्य चाणक्य हे एक कुशल राजनीतिज्ञ, चतुर कूटनीतिज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्यंचे नियम आजही जीवनात तंतोतंत लागी पडतात. चाणक्य नीति हा त्यांच्या नीतिंची एक संग्रह आहे. ज्याच्या उपयोगाने जीवन सरळ मार्गाने जगण्याचा मंत्र मिळू शकतो. जीवनात सफलता मिळण्यासाठी तसेच सरळ मार्गाने जीवन व्यतीत करण्यासठी आचार्य चाणक्य यांनी काही महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत. तर यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहीजेत हेही त्यांनी मांडलं आहे.

या आहेत आचार्य चाणक्यंनी सांगितलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी

अशा प्रकारे ज्ञान प्राप्त करा

चाणक्य नितीनुसार जो व्यक्ती शास्त्रातील नियमांनुसार ज्ञान ग्रहन करतो, त्याला अत्यंत वैभवशाली कर्तव्यांच्या सिद्धांतांचे ज्ञान प्राप्त होते. त्या व्यक्तीला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत व कोणत्या नाही केल्या पाहीजेत यांचे ज्ञान मिळते. तसेच चांगलं आणि वाईट यातील फरक समजू लागतो.

मुर्खांना उपदेश करू नये

आचार्य चाणक्य नुसार एखादी थोर व्यक्ती सुद्धा मोठ्या संकटात येऊ शकतात जर ते मुर्खांना उपदेश करत असतील. तसेच दृष्टांचे पालन पोषण करू नये व अत्यंत दु:खी व्यक्तीसोबत घनिष्ठ सबंध बनवू नये असही चाणक्यनिती म्हटलं आहे.

जवळच्यांची सुरक्षा करा

चाणक्य नीतिनुसार वर्तमान स्थितीतील संकटांशी सामना करण्यासाठी धन संचय करा. याशिवाय धन-संपती त्यागल्यानंतर सुद्धा पत्नीची सुरक्षा केलीच पाहिजे.

भविष्याचाही विचार करा

भविष्य काळात कधी काय घडेल सांगता येत नाही, त्यासाठी धन संचय असायला पाहिजे. याचा अर्थ धनवान व्यक्ती कधीच संकटात सापडतात अस नाही, जेव्हा संकटं येतात तेव्हा असलेलं धन देखिल जाण्यास सुरुवात होते.

या जागेवर कधीच राहू नका

चाणक्य नितीनुसार अशा ठिकाणी कधीच राहू नये जिथे तुमचा मानसन्मान नाही. जिथे तुमच्यासाठी कोणतही काम नाही, ज्या जागेवर धन प्राप्त करता येत नाही व जिथे कोणीही मित्र नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार