सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणा-या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद, पालघर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

युनायटेड पेट्रो.फायनान्स गोल्ड व्हल्युअर आयटीआय गोल्ड लोन शॉप नं.०३ आयरीश अपार्टमेंट पेट्रोलपंपाचे बाजुस पीएमसी बँक जवळ सेंट्रल पार्क नालासोपारा

मनीष गुप्ता
  • Jun 6 2020 7:16PM
पालघर - दि.२०/०९/२०१९ रोजी वेळी १०.२०वा.चे दरम्यान युनायटेड पेट्रो.फायनान्स गोल्ड व्हल्युअर आयटीआय गोल्ड लोन शॉप नं.०३ आयरीश अपार्टमेंट पेट्रोलपंपाचे बाजुस पीएमसी बँक जवळ सेंट्रल पार्क नालासोपारा पुर्व येथे ०६ अनोळखी आरोपी इसमांनी गोल्ड फायनान्सच्या ऑफीस मध्ये शस्त्रांसह येवून ऑफीसमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना शस्त्राचा धाक दाखवुन दरोडा टाकुन १,७६,८७,१३७/-रु किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुददेमाल घेवुन गेले बाबत फिर्यादी सुप्रज्ञा आनंद कदम वय-२४ वर्षे, रा. रुम.नं.३०२ विष्णुदिप अपार्टमेंट विराट नगर विरार पश्चिम यांनी तुळींज पो.ठाणे येथे दिलेल्या तक्रारी वरुन दि.२०/०९/२०१९ रोजी १८.४७ वा रोजी गु.र.नं. १०३४/२०१९ भा.दं.वि.सं.क ३९७, ४२७, सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४,(२७) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे गांभिर्य पाहुन विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई मा. श्री. निकेत कौशिक साो. आणि पोलीस अधीक्षक, पालघर मा.श्री.

दत्तात्रय शिंदे सो., अपर पोलीस अधीक्षक, वसई श्री. विजयकांत सागर, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विक्रांत देशमुख व अमोल मांडवे, उप विभा.पोलीस अधिकारी, नालासोपारा विभाग,पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र नाईक यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, यांनी २ टीम तयार करुन वसई युनीटचे सहा.पो.निरी. सुहास कांबळे व सहा.पो.निरी. संतोष गुर्जर यांना मिळालेल्या माहितीवरुन मा. पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांनी तात्काळ वसई युनीट मधील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवून योग्य त्या पध्दतीने मुंबई येथे सापळा रचून ४ आरोपीतांना दि. ०४/०६/२०२० रोजी अटक केली आहे. सदर आरोपीत यांचेकडे केलेल्या तपासात त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली. त्यांचेकडून गुन्हयातील सोन्याचे दागीने विकून आलेली रोख रक्कम, सोन्याचे दागीने, एक रिव्हॉल्वर, एक पिस्टल, ८ जिवंत काडतूसे, एक ईनोव्हा कार, एक प्रवासी रिक्षा असा एकुण ३९,७१,६००/- रु.चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

वरील अटक आरोपीत यांचेकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी नालासोपारा पो.ठाणे गु.र.नं. ७३०/२०१३ भादंविंस.कलम ३९७ (अॅक्सीस बँक - चोरीस गेलेली रक्कम तीन करोड सत्याऐंशी लाख पनास हजार रु.) हा गुन्हा उघडकीस आला असून वापी पो.ठाणे गु.र.नं. १०२/२०२० भादवि.कलम ३९७ सह भा.ह.का.कलम ३, २७ या दरोडयाचे गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक आरोपीत व त्यांचे साथीदार यांचेविरुद्ध खुन, दरोडे, चोरी, वाहन चोरी अशा स्वरुपाचे मुंबई, ठाणे, पालघर, तसेच गुजराथ, कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत.

सदर अटक आरोपीत यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वसई न्यायालय यांनी दि १४/०६/ २०२० पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदर गुन्हयातील पाहिजे आरोपीत यांचा शोध सुरु असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास अमोल मांडवे, उप विभा.पोलीस अधिकारी, नालासोपारा विभाग हे करीत आहेत.

वरील कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई मा. श्री. निकेत कौशिक सो. आणि पोलीस अधीक्षक, पालघर मा.श्री.दत्तात्रय शिंदे सो. अमोल मांडवे, उपविभा. पोलीस अधिकारी, नालासोपारा विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक, सहा.पो.निरी. सुहास कांबळे, स.पो.निरी. संतोष गुर्जर, स.फौ. चंद्रकांत कदम, सफौ/ महादेव वेदपाठक, पो.हवा./मंगेश चव्हाण, पो.हवा./जनार्दन मते, पो.हवा/ संजय नवले, पो.हवा./विकास यादव, पो.ना./ रमेश अलदर, पो.ना/ प्रशांत पाटील पो.ना./ मुकेश तटकरे, पो.ना/ गोविंद केंद्रे, पो.ना/ शिवजी पाटील पो.ना/सागर बारवकर, पो.ना.अमोल तटकरे, पो.ना./प्रशांत ठाकूर, पो.ना/मनोज सकपाळ, पो.शि./ शरद पाटील, पो.शि/ अश्विन पाटील, पो.शि/अमोल कोरे यांनी पार पाडली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार