सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपातर्फे योग दिनानिमित्त राज्यभर योग शिबीरे

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

Sudarshan MH
  • Jun 21 2021 6:25PM

आंतरराष्ट्रीय योग  दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे राज्यभर योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी  खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी झाले होते. राज्यात २ हजारांहून अधिक ठिकाणी पक्षातर्फे योग दिनाचे कार्यक्रम झाले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी योगसाधना केली.  मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील , प्रदेश उपाध्यक्ष  राज पुरोहित सहभागी झाले होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. योगविद्येमुळे प्रतिकार शक्ती आणि मनाचे सामर्थ्य वाढत असल्याने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर योग विद्येचा अधिकाधिक प्रसार व्हावा या हेतूने भाजपा तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आंतराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कोरोनाकाळात अधिकाधिक लोकांनी या योग शिबिरांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत पक्षाच्या  योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमांना पक्ष कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठी योग शिबिरांचे आयोजन  करण्यात आले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार