*यवतमाळ जिल्ह्यातील बोरीअरब येथे* *सव्वाचार कोटीचे अवैध बियाणे जब्त ,प्रशासनाची धडक कारवाई*
यवतमाळ - *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001* बीज प्रक्रिया केंद्रात अवैधरित्या तयार करण्यात आलेले ४ कोटी २० लाख रुपयाचे बियाणे जब्त करण्यात आले .
========== *बियाण्यामध्ये सोयाबीन तुर व हरभऱ्याचा समावेश*
यवतमाळ - *प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
बीज प्रक्रिया केंद्रात अवैधरित्या तयार करण्यात आलेले ४ कोटी २० लाख रुपयाचे बियाणे जब्त करण्यात आले . यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब येथे कृषी विभागाने ही धडक कारवाई केली . कृषी विभागाच्या ३ पथकाने ही कारवाई पार पाडली . बियाण्यांमध्ये तूर, सोयाबीन आणि हरभऱ्याचा समावेश आहे . बोरी अरब येथे धरतीधन सीड प्रोसेसिंग प्लांट मध्ये अवैधरित्या बियाणे तयार केलं जात होते . खुल्या बाजारातून सोयाबीन ,तूर ,चणा आणायचा आणि मशिनमधून छाटणी करून बॅग भरायची .तयार झालेली ३० किलोची बॅग शेतकऱ्यांच्या माथी मारायची असा हा त्यांचा गोरखधंदा होता . कमी दरात बियाणे मिळत असल्याने आशेपोटी शेतकरी ही बियाणे खरेदी करत होते . या बियाण्यांचा अखेर भंडाफोड करण्यात आला . गुप्त माहितीच्या आधार ही कारवाई करण्यात आली . या बीज प्रक्रिया केंद्रावरून ८५० quintal, सोयाबीन ६६० quintal तूर ,१७८० quintal लूज सोयाबीन आणि २७०० quintal चणा आदी जब्त करण्यात आले . या मालाची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचे तपास पथकाकडून सांगण्यात आले . बोगस बियाणे तयार करणाऱयांविरुद्ध अशीच धडक कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे . ऐन पेरणीच्या आधी हा भांडाफोड झाल्याने अवैध धंदे करण्याऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प