सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धुडीपाडा येथे आज जागतिक स्तनपान दिन सप्ताह ला सुरवात

धुडीपाडा येथे आज जागतिक स्तनपान दिन सप्ताह ला सुरवात करण्यात आली.

Nandurbar MH
  • Aug 4 2021 5:48PM

 नवापूर प्रतीनीधी गणेश वडनेरे
धुडीपाडा येथे आज जागतिक स्तनपान दिन सप्ताह ला सुरवात करण्यात आली.हा कार्यक्रम १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे.स्तनपानाचे संरक्षण: एक सामाजिक जबाबदारी हा विषय घेऊन आज अंगणवाडी केंद्र धुडीपाडा येथे उषाताई अमेश गावीत ( सरपंच धुडीपाडा) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.बाळाच्या जीवनातील पहिले १००० दिवस (स्त्री गरोदर राहिल्यापासून बाळ २ वर्षाचा होईपर्यंतचा काळ) हा बाळाची वाढ व विकास यासाठी महत्वाचा काळ असतो.बाळ या काळात स्तनपानासाठी व पोषणासाठी मातेवर अवलंबून असतो.यासाठी या काळात गरोदर माता व स्तनदा माता यांना त्यांच्या स्वतःच्या व बाळाच्या आहार विषयक मार्गदर्शन मा.श्री. संजय सर बालविकास अधिकारी नवापुर  यांनी केले.वरील सर्व कृतीसह मातेच्या व बाळाच्या त्वचेशी स्पर्श, जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान करणे आणि ६महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान करणे याबाबत मातांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सरपंच उषाताई गावीत, मा. श्री सुनिल साहारे सर (अमेरीकन इंडिया फोन्डशन नंदुरबार  ) मा.श्री. अमेश दादा गावीत (माजी सरपंच धुडीपाडा ) लाजरस गावीत ( उपसरपंच धुडीपाडा  ) धनराट केंद्र 1 व 2 अंगणवाडी सेविका या वेळी उपस्थित होत्या

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार