सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आजचा दिवस पत्रकार दिवस म्हणून का साजरा केला जातो ?

मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले. असे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये बाळशास्त्रींचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले.

S.n.ranjankar
  • Jan 6 2022 2:41PM
मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले. असे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे म्हणून 6 जानेवारी हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 मध्ये बाळशास्त्रींचा जन्म झाला.वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले.सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाद्वारे रुजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलेले कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. त्यांनी समाज सुधारणा व शिक्षणाची अभिवृध्दी हेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.जांभेकर यांना देशी व विदेशी 9 भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषांचाही अभ्यास केला होता.1834 साली भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक होण्याचा बहुमान बाळशास्त्रींना मिळाला. बाळशास्त्रींनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन व संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली.सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही, हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रांपासून प्रेरणा घेतली. नव्या वृत्तपत्रांचा संकल्प केला व तो कृतीत आणला.17 मे 1846 रोजी जांभेकरांचा आकस्मिक मृत्यू झाला. पण अल्पावधित त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले. मराठी पत्रकारिता आणि अनेक विद्याप्रांतांत न पुसता येण्याजोगा ठसा उमटवणारे अग्रणी विद्वान म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचं कर्तृत्व अजरामर ठरलं. अशा या थोर आद्य पत्रकारास अभिवादन करूयात!

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार