सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राचे कृषीमंत्री जेव्हा आदिवासी झोपडीत जाऊन खान्देशी भाकरीचा आस्वाद घेतात, पाहाणाऱ्यांचे डोळे पाणावले

मातीतला माणूस म्हणजे नेमकं काय असतं? याचं मूर्तीमंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Nandurbar MH
  • Jul 10 2021 7:30PM

नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
सविस्तर वृत्त
 मातीतला माणूस म्हणजे नेमकं काय असतं? याचं मूर्तीमंत उदाहरण आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. माणसाचं मातीसोबत एक वेगळं ऋणानुबंध आहे. मातीतूनच पीक उगवतं, मातीतूनच आपल्याला अन्न मिळतं. त्यामुळे मातीला, मातृभूमीला आपण आई मानतो. मातृभूमीची माती शेतकरी कपाळावर लावतो. या मातीचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत. औद्योगिकरणाच्या या युगात माणूस आपल्या मातीला म्हणजेच आईला विसरुन चाललाय, असं अनेकजण म्हणतात. पण ज्याची जन्माची नाळ मातीशी घट्ट रोवली गेलीय ती व्यक्ती मातीला आणि मातीतील माणसांना, शेतकऱ्यांना कधीच विसरत नाही. याची प्रचित आज खान्देशातील एका आदिवासी समाजाच्या शेतकरी कुटुंबाला आली आहे. *आम्ही ज्यांची गोष्टी सांगतोय ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादा भुसे यांची !*

*…आणि दादा भुसेंनी खान्देशी भाकरीचा आस्वाद घेतला*
दादा भुसे आज (10 जुलै) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अगदी शेतीच्या बांधावर जाऊन भेटीगाठी घेत होते. त्यांच्या समस्या जाणून घेत होते. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेड्याचा दौरा आटोपून झाल्यानंतर ते साळवे गावाजवळ हातनूरजवळ एका आदिवासी झोपडीजवळ थांबले. त्यांच्यासह त्यांचा पूर्ण ताफा तिथे थांबला. त्यांनी झोपडीतील आदिवासी शेतकऱ्यांची भेट घेतली. आदिवासी कुटुंबाची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या आग्रहाखात झोपडपट्टीतच खान्देशी भाकरीचा आस्वाद घेतला. हे सगळं पाहत असताना काही जणांचे मंत्री असावा तर असा अशा सुखद भावनेने डोळे पाणावले.
*कृषीमंत्र्यांचा धुळे, नंदुरबारचा दौरा-*
धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. वरुणराजाने पाठ फिरवल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांना मिळणाऱ्या योजना, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांनी धुळे, नंदुरबार दौरा केला. धुळ्याच्या शिंदखेडा येथील शेतकऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर पुढे मार्गक्रमण होताना दादा भुसे भुकेने व्याकूळ झाले. त्यांनी रस्त्यावरच दिसणाऱ्या आदिवासींच्या झोपडीजवळ वाहनचा ताफा थांबवला आणि त्या ठिकाणी आदिवासी बांधवांशी विचारपूस केली. कृषीमंत्र्यांनी भूक लागल्याची भावना व्यक्त केल्यानंतर आदिवासी कुटुंबाने त्यांना जेवून जाण्याचा हट्ट केला. अखेर मंत्र्यांनी तो हट्ट पूर्ण केला. दादा भुसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते्यांनी झोपडीत खान्देशी भाकरीचा आस्वाद घेतला.
*कृषीमंत्री आणि चिमुकला एकाच ताटात जेवले*
कृषीमंत्री यांच्या साधेपणाचं पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन बघायला मिळाल. दादा भुसे यांच्यासह इतर पदाधिरी जेवणासाठी झोपडीत बसले तेव्हा आदिवासी कुटुंबातील चिमुकल्यांना त्यांनी जेवणासाठी विचारलं. त्यानंतर त्यांनी चिमुकल्यांना आपल्याजवळ जेवायला बसवलं. त्यापैकी एक लहान मुलगा तर थेट कृषीमंत्र्यांसोबत एकाच ताटात जेवताना दिसला. राज्याचे कृषीमंत्री सगळाच प्रोटोकॉल बाजूला सारुन अवघ्या पाच वर्षाच्या चिमुकल्यासोबत एकाच ताटात जेवताना बघून उपस्थितांच्या भुवया अभिमानाने उंचावल्या.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार