संभाजीनगर, परंपरेप्रमाणे दरवर्षी हिंदु नववर्षानिमित्त गुलमंडी येथे गुढी उभारण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते गुढीचे विधिवत पूजन केले.
हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सायंकाळी संस्थान गणपती ते खडकेश्वर शिव मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येते. मात्र प्रशासनच्या विनंतीनुसार यावर्षी शोभायात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली. सर्व नागरिकांना आरोग्यदायी शुभेच्छा देत नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदिप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, युवासेना प्रभारी जिल्हायुवाधिकारी मच्छिद्र देवकर पाटील, नगरसेवक सचिन खैरे, सचिन लखासे, सुभाष मुळे, दत्ता इंगळे, पूनमसिंग राजपूत, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सुनीता देव, उपजिल्हा जिल्हासंघटक नलिनी बाहेती आदींची उपस्थिती होती.