(योगेश शर्मा)
बुलढाणा : जुगाराच्या गुन्ह्यातून हॉटेल मालकाचे नाव वगळण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या चिखली पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला १० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. स्वप्नील जगदेवराव रणखांब (29) रा मोहदी, ता महागाव,जि यवतमाळ असे त्याचे नाव असुन तो सध्या चिखली पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदावर राहत होता.चिखली खामगाव रोडवरील हॉटेल अमृततुल्य च्या आवारात आज सायंकाळी 7 च्या सुमारास हि कारवाई करण्यात आली.
दिनांक 23 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी हॉटेल अमृततुल्य वरील जुगार अड्यावर छापा मारला होता याप्रकरणी हॉटेल मॅनेजर सह 8 जणांना ताब्यात घेत सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी या नात्याने रणखाब ह्याने हॉटेल मालक यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती.मात्र हॉटेल मालकांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांना एसीबीकडे तक्रार केली होती.एसीबीने पडताळणी केल्यानंतर आज साफळा रचला होता. या साफळ्यात पीएसआय रणखांब 10 हजाराची लाच घेताना अलगद अडकला.याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर पुढील कारवाई सुरू होती.
हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड,अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा चे पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी,पोना विलास साखरे,रवींद्र दळवी ,पोलीस शिपाई जगदीश पवार,विनोद लोखंडे,चालक पोलीस शिपाई मधुकर गरड यांनी पार पाडली.