सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

इम्तियाज जलील यांच्याया विधानाचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करते.

बकरी ईद कशी साजरी करायची हे आम्ही ठरवू ते गृह विभागाने ठरवू नये”* - इम्तियाज जलील, खासदार - एम आय एम, (औरंगाबाद) या विधानाचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करते

Snehal Joshi .
  • Jul 22 2020 5:48PM
“बकरी ईद कशी साजरी करायची हे आम्ही ठरवू ते गृह विभागाने ठरवू नये सरकारच्या नियमांचे पालन करत रमझान आम्ही घरात साजरी केली परंतु बकरीईद राज्य सरकारच्या घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्व व नियमांच्या अधीन राहून करणे शक्य नाही.” एम.आय.एम. चे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे उलेमांच्या बैठकीत केलेल्या या विधानाचा विश्व हिंदू परिषद जाहीर निषेध करते. औरंगाबाद येथील एम.आय.एम.चे खासदार इम्तियाज जलील सारख्या लोक प्रतिनिधीचे देशाची गंभीर नाजूक परिस्थिती लक्षात न घेता केलेले असंबंध व बेताल वक्तव्य हे धर्मांधतेचे तसेच संकुचित, व देश विघातक मनोवृत्तीचे दर्शन घडविते. हा तोच पक्ष आहे ज्याचे नेते नेहमी संविधानाच्या बाजूने बोलत असतात परंतु आता देशाच्या नाजूक परिस्थिती विधीद्वारा संविधाना द्वारा स्थापित सरकारच्या गृह मंत्रांचे आदेश मानण्यास मात्र आज साफ नकार देत आहेत. प्रशासनाला सहकार्य करणे हेच कोणत्याही सजग नागरिकाचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे. या उलट लॉकडाऊनच्या कालावधीत जेथे सोशल डिस्टसिंगचे पालन करून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर सर्व धर्मीयांची प्रार्थानागृहे बंद हेती. तेथे फक्त मस्जिद व लाउडस्पीकरवर आझान मात्र बिन दिक्कत सुरु होत्या. कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात न घेता फक्त मुस्लीम समाजाला बकरी ईद साजरी करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये शिथिलता अथवा सुट देण्यात यावी मुस्लीम नेत्यांच्या आडमुठे पणा मुळे आधीच व्हेन्टीलेटर वर असलेल्या राज्यात कोरोना संक्रमण अधिक पसरून लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागणार आहे. त्याच बरोबर बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढणार आहे. देशाची नाजूक परिस्थिती व सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत विश्व हिंदू परिषद सरकारला निवेदन देत मागणी करत आहे - १. बेताल वक्तव्य करून राज्यात कायदा सुव्यवस्थेळा धक्का पोहोचवणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी. २. हिंदू सणां प्रमाणे बकरीईद साठी जारी केलेल्या नियमावलीची कठोर अमलबजावणी करावी. ३. नियमांची पायमळणी करून कोरोना संक्रमण वाढवण्यास सहकार्य करण्यार्या व्यक्ती विरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा येत्या काळात मुस्लीम समुदायाला झुकते माप दिल्यास सरकारला जनतेच्या भयंकर रोषाला सामोरे जावे लागणार आहे. देशात सध्या सुरु असलेल्या कोरोना जैविक वैश्विक महामारीचा प्रकोप पाहता व महाराष्ट्रातील दिवसेंदिवस वाढणारी रुग्ण संख्या पाहता आज भारतीय समाज बिनपगारी असून ही १२० दिवस कडक लॉकडाऊनचे व सरकारच्या सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करित आहे. लॉकडाऊन मध्ये अनेकांचे रोजगार हे गेल्यातच जमा आहे. इतक्या नाजूक व कठीण परिस्थितीत देखील देशातील हिंदू समाज सामंजसपणा दाखवत सरकारला सहकार्य करत आहे. या कालावधीत सर्व मंदिरे, गुरुद्वारा, इत्यादी प्राथनागृहे सर्व सभागृहे बंद ठेवण्यात आलेली होती. तसेच सर्व प्रकारचे कार्यक्रम, लग्न समारंभ, व अनेक मोठे सण व धार्मिक उत्सव देखील रद्द करण्यात आलेले होते. तसेच हिंदू मान्यतेनुसार अत्यंत महत्वाचे मानले जाणारे सण/उत्सव जसे हिंदू नववर्ष गुढीपाडवा, श्री राम नवमी, श्री हनुमान जन्मोत्सव, अक्षय तृतीया, वट पौर्णिमा, आषाढी एकादशी, गुरु पौर्णिमा, नाग पंचमी हे घरच्या घरी साजरे करण्यात आले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार