सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

खांडबारा येथे साडे अकरा हजाराचा अवैध मद्य साठा जप्त संशयितास अटक, खांडबारा येथे विसरवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे विनापरवाना देशी-विदेशी दारु व बिअर विक्री करणाऱ्या संशयितास विसरवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे साडे अकरा हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

Nandurbar MH
  • Jul 5 2021 10:45AM


नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे
 नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे विनापरवाना देशी-विदेशी दारु व बिअर विक्री करणाऱ्या संशयितास विसरवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे साडे अकरा हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे कुंभार गल्लीत एक इसम किराणा दुकानाच्या भिंतीच्या आडोश्याला देशी-विदेशी मद्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता संजय रतिलाल कुंभार (रा. कुंभारगल्ली, खांडबारा, ता.नवापूर ) याच्याकडेदेशी-विदेशी मद्याच्या खोक्यांसह - बिअरचे खोके विनापरवाना आढळून आले. त्याच्याकडून पोलिसांनी ११ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोकॉ. भूषण चित्ते यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिसात संशयित संजय कुंभार याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. विश्वास गावित करीत आहेत. सदरची कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोहेकॉ. सुरेश मोरे, पोना. अनिल राठोड, पोकॉ. भूषण चित्ते यांच्या पथकाने केली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार