सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे एका चौदा वर्षाच्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

विसरवाडी - नवापूर तालुक्यातील खडकी येथील एका चौदा वर्षाच्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत एका संशयिताविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Nandurbar MH
  • Jul 3 2021 10:56AM


 नवापूर प्रतिनिधी गणेश वडनेरे

विसरवाडी - नवापूर तालुक्यातील खडकी येथील एका चौदा वर्षाच्या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत एका संशयिताविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी येथील एका अल्पवयीन मुलीस पालकांच्या राहत्या घरुन काहीतरी फुस लावुन पळून नेले असता अपहरण मुलगी व संशयित आरोपी या दोघांना कोकणीपाडा ता. जि. नंदुरबार येथून ताब्यात घेऊन अपहरण मुलीचा महिला पोलिस अंमलदार यांचे समक्ष जबाब नोंदविला तसेच वैद्यकीय तपासणी करून तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर विशाल विष्णु वळवी रा. कोकणीपाडा ता. जि. नंदुरबार च्याविरुद्ध कलम भारतीय दंड विधान कलम 376(3), 366(अ) सहा बालकांचे लैंगिक प्रधान पासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4 अन्वये कलम वाढ करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत.

 सदर संशयित आरोपीस नंदुरबार विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता दि. ५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार