सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती, जय जिजाऊ, जय शिवराय!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. "जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! " असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे.

Snehal Joshi .
  • Sep 15 2020 12:06PM
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे (Agra Mughal Museum) नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास ट्विट केलं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय! म्हणत योगी सरकारच्या निर्णयाची स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल अशी घोषणा केल्यावर फडणवीस यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. "जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय! " असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांचा जयजयकार केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांचं ट्विट फडणवीस यांनी रिट्विट केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी "आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत" असं म्हटलं आहे. यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने, राज्यातील 11 हुतात्म्यांच्या नावाने त्यांच्या जिल्ह्यातील एक-एक रस्त्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अधिसूचनादेखील काढली आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार