सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सत्तेसाठी मुहूर्त तुम्हालाच विचारून काढतो,--देवेंद्र फडणवीस

फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत केल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Snehal Joshi .
  • Sep 1 2020 11:56PM
महाविकास आघाडीचं लवकरच विसर्जन होणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असं सातत्यानं भाकीत करणाऱ्यांचे स्वतः फडणवीसांनीच आज कान टोचले. राणे, आठवलेनंतर आज खासदार गोपाळ शेट्टी यांनीही फडणवीस लवकरच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं भाकीत केल्याने अनेकांचे भुवया उंचावल्या. त्यामुळे सत्ता विसर्जनाचा मुहूर्त नेमका कधी काढायचा हे असे वक्तव्य करणाऱ्यांशी चर्चा करूनच ठरवणार असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. दहिसरमधल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरोग्य महोत्सवात ते बोलत होते. इतकंच नाही तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फडणवीस यांना गदा भेट दिली. त्यावर याचा प्रहार फक्त कोरोनाच्या लढाईसाठी करणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सध्या आमच्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाई महत्वाची असून सत्तेत येणं हा गौण भाग असल्याचं सांगत सर्व चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार