सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारला विक्रेत्यांच्या कोरोना चाचणीसठी विशेष मोहिम;10 पथके कार्यान्वित*

कोरोना चाचणीसठी विशेष मोहिम;10 पथके कार्यान्वित

Nandurbar. MH
  • Mar 13 2021 4:51PM
नंदुरबार : शहरातील व्यावसायिक, फेरीवाले तसेच भाजीपाला विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम सुरु करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा शहरात नंदुरबार जिल्ह्याच्या एकूण रुग्णांचे 80 टक्के कोविड रुग्ण असून रुग्णवाढीचा आलेख दर दिवसाला उंचावत आहे. हे लक्षात घेऊन मास्क न लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. अशा 5 हजारहून अधिक जणांकडून 11 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून नंदुरबार व शहादा शहर हद्दीतील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, निवासी शाळा, कॉलेज, वसतीगृहे, कोचिंग क्लासेस व प्रशिक्षण केंद्र 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. आता त्या बरोबरच शहरातील व्यावसायिक, फेरीवाले तसेच भाजीपाला विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम सुरु करण्यात येत आहे. 
       शासकीय माहितीत म्हटले आहे की, शहरात 10 पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे. शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय बँक चौक, शहर पोलीस स्टेशन जवळ, नेहरू चौक येथे स्थिर पथके नियुक्त करण्यात आली आहेत, तर सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट ते कोरीट नाका, धुळे चौफुली ते बस स्टॅन्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागात फिरत्या पथकामार्फत व्यावसायिकांची रॅपीड ॲन्टीजन चाचणी करण्यात आली. या मोहिमेसाठी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी जयेश सूर्यवंशी यांचे सहकार्य करीत आहेत. पुढील काही दिवस ही मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी कोरोनाची लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी केले आहे.
------

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार