सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दुध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात शासन सकारात्मक - ना. विखे पाटील

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Shruti Turkane
  • Nov 21 2023 9:28PM

मुंबई: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला जास्तीत - जास्त भाव मिळावा, यासाठी शासन सकारात्मक असून यापुर्वी विभागाने प्रयत्न केलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांनी पुढाकार घेण्याचे आवाहन महसूल, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राज्यातील दुध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. (महानंद) मुंबईचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमून्य काळे, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ विभागीय प्रमुख आणि राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दुध संघाचे प्रतिनिधी, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते
मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.सध्या दुधातील भेसळ रोखण्यासाठी ही प्रयत्न केला जात आहे.दुधातील भेसळ रोखण्यात यश आले तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भाव देणे शक्य होणार आहे.दुधाची गुणवत्ता टिकविणे अत्यंत आवश्यक आहे.दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठीत करण्यात येत असून, त्यांचेमार्फत तपासणीअंती दूध भेसळ करणाऱ्यांवर तसेच भेसळयुक्त दूध घेणाऱ्या संस्थावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिल्कोमीटर व वजनमापाच्या त्रुटीबद्दल वजनमापे विभागाला तत्काळ निर्णय घेण्याबाबत सूचित करण्यात येईल. दुधाचे गुणप्रत ठरविताना 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ वरुन 3.2 फॅट व 8.3 एसएनएफ करण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलणार, दुध पावडर निर्यातीबद्दल केंद्र शासनाशी संपर्क करुन विनंती करण्यात येणार येईल. पशुधनास गुणवत्तापूर्ण पशुखाद्य किफायतशीर दरात उपलब्ध होण्यासाठी आयुक्त, पशुसंवर्धन यांचे अध्यक्षतेखाली सर्व समावेशक पशुखाद्य गुणवत्ता व दर समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे असे ही श्री विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दुध संघाचे प्रतिनिधी आणि प्रमुख पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींनी दुध व्यवसाय संबंधित असलेल्या अडचणी सांगितल्या. याअडचणी संबंधित विषय मंत्रीमंडळात चर्चा करुन यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे ही श्री विखे पाटील यांनी सांगितले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार