सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विधानसभा, विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन ऑनलाइन*

22 जून पासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ३ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात पुरवणी मागण्यासांठी आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी एक दिवसाचे विशेष अधिवेशनाची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Snehal Joshi
  • Jun 12 2020 9:25PM
22 जून पासून नियोजित महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आता ३ ऑगस्टपासून घेण्यात येणार आहे, आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. दरम्यानच्या काळात पुरवणी मागण्यासांठी आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी एक दिवसाचे विशेष अधिवेशनाची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून यासंदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाबाबत सर्वांनी एकमताने निर्णय घेऊन ३ ऑगस्ट २०२० ही तारीख निश्चित केली आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार