सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विश्व हिंदू परिषदेला हिन्दू मृतदेहाचे अंत्यविधि करण्याची अनुमती द्यावी,अन्यथा आंदोलन करावे लागेल...*

विश्व हिंदू परिषदेने मुंबई मनपाला सहकार्य देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच कोविड मुळे मृत्यु पावलेल्या हिंदू मृतदेहांचे अंत्यविधी करण्यास अनुमती द्यावी अशी विनंती केली. परंतु मुंबई मनपाने आमची सहकार्य करण्याची कोणतीही विनंती मान्य केली नाही.

Snehal Joshi
  • Jun 20 2020 11:28PM
कोविड महामारीच्या काळात विश्व हिन्दू परिषदेने अन्न वाटप, रूग्ण वाहीका आणि कोविदमुळे मरण पावलेल्या मृत देहांचे अंत्यसंस्कार करण्यास मुंबई मनपाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे लेखी कळविले होते.परंतु याबाबत मुंबई मनापाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.दुसरीकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ़ इंडिया आणि इतर मुस्लिम संघटनांनामात्र याबाबत अनुमती दिली आहे.हा दुजाभाव कशासाठी? विश्व हिंदू परिषदेकडे फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपलब्ध आहेत व गेल्या ५६ वर्षांपासून वि.हिं.प.देशात आणि जगभरात अनेक ठिकाणी अनेक सेवा प्रकल्प यशस्वी राबवित आहे. आज कोविड वैश्विक महामारीमुळे संपूर्ण विश्व त्रस्त आहे,तसेच मुंबई महानगरात कोविद रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. दुर्भाग्य कि अनेक मुंबईकरांचा ह्या जीवघेण्या आजारामुळे दुर्देवी मृत्यु होत आहे. लॉकडाउनच्या अगदी पहिल्या दिवसा पासून विश्व हिंदू परिषद आपल्या कार्यकर्त्याच्या मदतीने खाद्यान्न वितरण, सैनिटाइज़र, मास्क वितरण, रक्तदान आणि चिकित्सा सहायतेसाठी नागरीकांची युद्ध पातळीवर सेवा करीत आहे. दिनांक २३ मार्च रोजी वि.हिं.प. ने आपल्या अधिकृत ट्विटर हैंडल वरून मुंबई मनपाला विनंती केली होती की वि.हिं.प. कार्यकर्ते मुंबई मध्ये फूडपैकेट्स आणि एम्बुलेंस सोबत आपली सेवा प्रदान करण्यास इच्छुक आहेत. देशासमोरील या गंभीर संकटाच्या वेळी मनपाच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत परंतु दुर्भाग्य, मुंबई मनपाने यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पुन्हा एकदा दिनांक 28 मे रोजी वि.हिं.प. ने आपल्या अधिकृत ट्विटर हैंडल वरून व दिनांक 3 जून 2020 रोजी आधिकृत पत्र लिहून मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची विनंती केली. व आमचे कार्यकर्ते कोविड महामारीत मुंबई मनपाला सहकार्य देण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेच कोविड मुळे मृत्यु पावलेल्या हिंदू मृतदेहांचे अंत्यविधी करण्यास अनुमती द्यावी अशी विनंती केली. परंतु मुंबई मनपाने आमची सहकार्य करण्याची कोणतीही विनंती मान्य केली नाही. असे आम्हाला नमूद करावे लागत आहे. त्याचवेळी आम्हाला असेही समजले की मनपाने अशाच कारणासाठी रज़ा अकादमीला ताबडतोब अनुमति दिली. एवढच नाही तर कुप्रसिद्ध संगठना असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ( PFI)साठी मुंबईतील सर्व हॉस्पिटल्सना सरकारी आदेश काढून सूचित केले की कोविड मुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधि करण्यासाठी PFI संगठनेशी संपर्क साधावा.याबाबत असे दिसते की काही निवडक राजकारण्यांच्या दाबावाखाली येत. मुस्लीम तुष्टीकरणाचे गलिच्छ राजकारण केले जात आहे. मुंबईतील बड़ा कब्रस्तानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले मुंबई मनापाला हिंदू संघटनाचे सहकार्य प्राप्त न झाल्याने आम्ही २००हून जास्त हिन्दू मृतदेहांचे अंत्यविधि केले आहेत.वास्तव मात्र असे आहे की हिन्दू संघटनांना अनुमति मागून देखील दिली गेली नाही.विश्व हिन्दू परिषदेने २३ मार्च २०२० पासून म्हणजेच लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवसा पासून मुंबई मनपाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती. या पार्श्वभूमीवर वि.हिं.प.अशी मागणी करीत आहे की मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण बंद करावे.सेवाकार्यातील दुजाभाव थांबवावा आणि विश्व हिंदू परिषदेला हिन्दू मृतदेहाचे अंत्यविधि करण्याची अनुमती द्यावी,अन्यथा आम्हाला संविधानाद्वारे प्राप्त लोकतांत्रिक अधिकारा अनुसार नाइलाजास्तव आंदोलन करावे लागेल असा इशारा विश्व हिंदू परिषद. मुंबईचे संयुक्त सचिव/ प्रवक्ता श्रीराज नायर यांनी दिला आणि सुदर्शनशी बोलताना सांगितल की दोन दिवसाच्या आत आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार