सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वेरूळ घाटात फेकला औषधांचा साठा; आरोग्य - वन विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांसह वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका

सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेरूळ घाटातील वन वनविभागाच्या हद्दीत शासकीय औषधींचा मोठा साठा बेजाबदारीपणे फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shruti Turkane
  • Apr 20 2024 3:26PM
रत्नपुर: सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वेरूळ घाटातील वन वनविभागाच्या हद्दीत शासकीय औषधींचा मोठा साठा बेजाबदारीपणे फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोग्य व वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक व वन्यप्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी अरुण तांबरे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ व ग्रामीण रुग्णालय खुलताबादच्या हद्दीत वेरूळ घाटालगत असलेल्या वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधांसाठा फेकून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे नागरिक, जंगली जनावर व पशू पक्षी यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. हा फेकून देण्यात आलेला हा औषध साठा कोणत्या विभागाचा आहे? याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. काल बाह्य झालेला शासकीय औषधसाठा नष्ट करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणानियुक्त असून यावर लाखोंचा खर्च होत आहे. मात्र अशा पद्धतीने किमती औषधसाठा का फेकण्यात आला याविषयाची चौकशी करण्याची मागणी अरुण तंबारे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली असून या संबंधीचे निवेदन त्यांनी नायब तहसीलदार प्रमोद सामंत यांना दिले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार