सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वाशी ,रत्नागिरी ,वाईतील मुलींची सोशल मिडीयावर बदनामी करणा - यास पुण्यात अटक

वाई (जि. सातारा) : बनावट फेसबुक अकाउंटद्वारे महिला व मुलींशी ओळख करून त्यांच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्‍लील फोटो फेसबुक व समाजमाध्यमांवर सोडून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली

Sudarshan MH
  • Dec 25 2020 1:05PM
वाई (जि. सातारा) : बनावट फेसबुक अकाउंटद्वारे महिला व मुलींशी ओळख करून त्यांच्या फोटोमध्ये फेरफार करून अश्‍लील फोटो फेसबुक व समाजमाध्यमांवर सोडून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. याप्रकरणी जानेवारी 2020 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांकडून गुन्ह्यातील संशयिताचा शोध सुरू होता. वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सिंहगड रस्ता, पुणे येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

प्रवीण रेमजे असे त्याचे नाव आहे. त्यास वाई न्यायालयाने 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.संशयिताने 25 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान वाईतील एका मुलीस बनावट फेसबुक खात्यावरून फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून ओळख काढली. या वेळी त्याने मुलीचा व्हॉटसऍप मोबाईल नंबर घेतला. यानंतर तिच्या फेसबुकवरील फोटोचा गैरवापर करून अश्‍लील फोटो तयार केले. ते फोटो मुलीला पाठविले, तसेच बनावट फेसबुक खात्यावर पाठविले. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तांत्रिक पद्धतीने व बातमीदारामार्फत तपास केला. संशयिताने बीड येथील दुसऱ्याच्या नावावर असलेले सीमकार्डचा वापर करून बनावट फेसबुक खाते उघडून वाशी, रत्नागिरी, वाई येथील मुली व महिलांची अशा पद्धतीने बदनामी होईल, असे कृत्य केल्याचे व त्याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली.

पुणे येथे हॉटेलमध्ये वेटरकाम करताना सहकाऱ्यांचे सिमकार्ड चोरून संशयिताने हे गैरकृत्य केले. संशयिताचे सर्व मोबाईल बंद लागत होते. त्याच्या सध्याच्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त होत नव्हती. त्यामुळे संशयित मिळून येत नव्हता. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी तांत्रिक माहिती मिळवत कसोशीने तपास केला. त्याला पुणे येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक श्रीमती शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खोबरे यांच्या सूचनांप्रमाणे सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृष्णराज पवार, पोलिस नाईक प्रशांत शिंदे, हवालदार सोमनाथ वल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी केली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार