सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्व. मुंडे साहेब व स्व. पंडित अण्णांनी कारखान्याचा आशिया खंडात नावलौकिक केला, तो जपणे सर्वांचीच जबाबदारी - धनंजय मुंडे

तोडणी व वाहतुकदारांचे हातावर पोट, त्यांचे पैसे थकवणे अशोभनीय, निवेदनावर सकारात्मक कार्यवाहीचे कारखाना प्रशासनाचे आश्वासन

Abhimanyu Phad
  • Sep 30 2022 1:26PM
परळी  - वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा परळी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एकेकाळचा आत्मा, मात्र मागील काही वर्षात या कारखान्याची अवस्था वाईट झाली, यावर्षी ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून कारखान्याकडे सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन उसाची नोंद आहे, त्यामुळे यावर्षी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने व वेळेत सुरू व्हावा तसेच कारखान्याने क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

धनंजय मुंडे हे देखील वैद्यनाथ कारखान्याचे सभासद असून, त्यांनी आज कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने करखान्याच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कारखान्याचे कर्मचारी, ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांचे निवेदन धनंजय मुंडे यांनी कारखान्याचे एम डी श्री. जी. दीक्षितुलू, तसेच व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांना दिले, तसेच कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या वतीने संचालक फुलचंद कराड यांनी निवेदन स्वीकारले. 

मागील दोन ते तीन वर्षात या भागात चांगला पाऊस झाल्याने ऊसाचे जोरदार उत्पादन आहे, मात्र वैद्यनाथ कारखान्याची सगळा ऊस गाळप करायची परिस्थिती नव्हती, मागील 2021-22 च्या हंगामात ज्या शेतकऱ्यांनी 15 फेब्रुवारी 2022 नंतर कारखान्यात ऊस घातला, त्याबचे एफआरपी मधील प्रतिटन 500 रुपये देयक अद्याप प्रलंबित आहे. एप्रिल 2022 पासूनचे कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत शिवाय बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मागील 10 ते 12 वेतन थकीत असून, बहुतांश कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम कारखान्याने भरलेली नाही; यासंदर्भात काही कर्मचाऱ्यांनी याआधी आंदोलनेही केली, असून त्याचीही आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली आहे. 

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब, स्व. पंडित अण्णा मुंडे या बंधूनी शेतकऱ्यांच्या हितार्थ हा कारखाना चालवून आशिया खंडात नावलौकिक केला. कर्मचारी हे करखाण्याचा महत्वाचा कणा आहेत, त्यांचे पगार थकवणे हे अशोभनीय असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले असून कारखान्याने तातडीने वेतन अदा करावेत असा सल्लाही दिला आहे. 

काही ऊसतोडण कामगार - वाहतूकदार यांनी आपल्याकडे निवेदने दिली असून, अनेकांची 2017 - 18 या हंगामासह 2021-22 या हंगामातील ऊसतोडणी, वाहतूक व मालकतोडीचे वाहतूक बिले देखील कारखान्याकडे प्रलंबित आहेत. हातावर पोट असलेल्या या वर्गाचे देयके कारखान्याने त्वरित अदा करावेत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 

मागील वर्षी शेतकऱ्यांना आपला ऊस घालण्यासाठी वेगळी झटपट करावी लागली आणि त्याचे पैसे मिळवण्यासाठी तर अजूनही शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे, अशा परिस्थितीत वैद्यनाथ कारखान्याने वेळेत कारखाना सुरू करून क्षेत्रातील 100% ऊसाचे गाळप करावे तसेच ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी आदींचे थकीत पैसे द्यावेत अशी प्रमुख मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. कारखान्याच्या वतीने एम डी श्री. दीक्षितुलू यांनी सर्वच मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबत यावेळी आश्वस्त केले आहे.

याप्रसंगी धनंजय मुंडे यांच्यासह वैद्यनाथचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव, एम डी श्री. जी. दीक्षितुलू, संचालक फुलचंद कराड, युवा नेते अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, ज्ञानोबा मुंडे, शिवाजी सिरसाट, ऍड. गोविंदराव फड, सूर्यभान नाना मुंडे, माणिकभाऊ फड, पिंटू मुंडे, सुरेश मुंडे, वसंत तिडके, बाबुराव जाधव, शरद राडकर, भगवान राडकर, पांडुरंग गंगणे, सुखदेव सांगळे, संतराम मुंडे, एकनाथ गुंजकर, राजाभाऊ पौळ, दिलीपराव कराड, मोहनराव सोळंके, मधुकर  झिंजुर्डे, रुस्तुम सलगर, अंगद कांदे, बालाजी चाटे, माणिक मुंडे, शेख सुलतान, वसंत राठोड, बालासाहेब चव्हाण, बंडू गुट्टे, विश्वांभर फड यांसह संचालक मंडळातील काही सदस्य, सभासद व शेतकरी उपस्थित होते.

वैद्यनाथ कारखान्याकडे जाताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत गोपीनाथगड येथे स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी जाऊन दर्शन घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार