सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगी प्रकरणी गठीत केलेली समिती म्हणजे राज्य सरकारचा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार.

विरार - विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीमध्ये एकूण पंधरा जण होरपळून मृत्यू पावले तसेच या आगीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे नातेवाईक सुद्धा या धक्क्याने मृत झाले आणि त्यामुळे या अपघातामुळे झालेल्या बळींची संख्या जवळपास १७ झाली आहे.

Sudarshan MH
  • Apr 25 2021 5:54PM
राज्य सरकार या प्रकरणात अत्यंत उदासीन दोषींना वाचवण्यासाठी धडपड भाजपाचा आरोप राज्य पातळीवरील तज्ञांच्या समिती मार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी - भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील 


विरार - विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीमध्ये एकूण पंधरा जण होरपळून मृत्यू पावले तसेच या आगीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे नातेवाईक सुद्धा या धक्क्याने मृत झाले आणि त्यामुळे या अपघातामुळे झालेल्या बळींची संख्या जवळपास १७ झाली आहे. एकूणच हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि मा पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दाखल घेऊन मदत जाहीर केली.  या प्रकरणी  राज्याचे आरोग्य  मंत्री राजेश टोपे यांनी हा विषय नॅशनल न्यूज नाही असं सांगून त्याचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच भूमिकेला धरून राज्य सरकारने ह्या आगीची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती म्हणजे केवळ एक फार्स ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालघर चे जिल्हाधिकारी  माणिकराव गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती मध्ये पालिकेचे आयुक्त पोलीस, उपायुक्त व जिल्हा वैद्यकीय अधिकारी व विशेष म्हणजे ज्यांच्या निष्क्रियपणा मुळे ह्या आगीसारख्या घटनेला वाव मिळाला ते वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे सुद्धा या समितीमध्ये वर्णी लावून राज्य सरकारने या विषयांमध्ये आम्ही किती गंभीर आहेत हे दाखवून दिलेला आहे.वसई विरार मधील आस्थापनांच्या अग्निसुरक्षा संदर्भातली जबाबदारी असलेले दिलीप पालव यांच्या कार्यक्षमतेवर  संपुर्ण वसई-विरार महापालिका क्षेत्रातील  जनतेने प्रश्नचिन्ह उभे केले असताना आणि या तसेच अन्य आस्थापनांना मध्ये नियमबाह्य पद्धतीने अग्नी सुरक्षेसंदर्भात प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नागरिक करत आहेत  या गोष्टी वादाच्या भोवऱ्यात असताना सुद्धा दिलीप पालव यांचीच या समितीमध्ये वर्णी लावणं म्हणजे एक प्रकारे या सगळ्या प्रकरणांमध्ये संशयित दोषी अश्या दोन्हींना  क्लीनचिट देऊन हा विषय संपवून टाकण्याचा प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी मधून म्हणून तीव्र निषेध करतो आहोत या गंभीर प्रकरणांमध्ये राज्याच्या मुख्य सचिव किंवा त्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसेच राज्य पातळीवर तज्ञ लोकांच्या समितीमार्फत चौकशी व्हावी  त्याच पद्धतीने या सगळ्या प्रकारामध्ये वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचा कारभाराची सुद्धा  चौकशी व्हावी आणि वसई विरार मधल्या एकूणच हॉस्पिटल्स, शाळा, मॉल्स व इतर सार्वजनिक आस्थापना मधील अग्निसुरक्षा संबंधी त्रुटीचा  त्या यांचाही आढावा घेतला जावा अशी  मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार