सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान

धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांनी कारचा ताबा घेतला

Snehal Joshi .
  • Jul 21 2020 7:07PM
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाला दवाखान्यात दाखल करून जिल्हाधिकारी मुधोळ- मुंडे यांनी कारचा ताबा घेतला आणि दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या. जिल्ह्यातील काही खासगी दवाखाने कोरोना रुग्णांना उपचार देण्यास असमर्थता दर्शवत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मुधोळ-मुंढे यांनी अशा दवाखान्यांना कारवाईसंदर्भात नेाटिसा बजावून अचानक भेटी देऊन कारवाईचाही इशारा दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत संलग्न काही खासगी दवाखान्यांना सोमवारी जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्या. त्या सह्याद्री हॉस्पिटल तसेच सुविधा हॉस्पिटलमध्ये गेल्या. सुविधा हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर गाडीत बसून कार्यालयाकडे जाताना त्यांच्या कारचे चालक जवळगे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याला सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांनी स्वत: कार चालवत दोन किलेामीटर ड्रायव्हिंग करत ऑफिसला पोहोचल्या.. जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्या प्रसंगावधानाबद्दल आणि कार्यतत्परतेबद्दल कौतुक होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार