सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक केंद्र

शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याची महत्वकांक्षा घेऊन नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच ॲग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी काल मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

Snehal Joshi .
  • Sep 17 2020 9:45PM
शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणण्याची महत्वकांक्षा घेऊन नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित पहिल्यांदाच ॲग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी काल मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. नागपूर जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत आणण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या पुरवठ्याच्या साखळीला अधिक चालना देण्याबरोबरच ग्रामीण कृषी उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा अत्याधुनिक कृषी केंद्राची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करुन हे ॲग्रोटेक सेंटर मध्यस्थीचे काम करेल असे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. हे केंद्र उभारण्याच्यादृष्टीने नागपूर परिसराचा आणि राज्याच्या कृषी क्षेत्राचा बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. हे ॲग्रोटेक केंद्र सार्वजनिक भागीदारी तत्वावर उभारले जाणार असून येथे कृषी व फळ प्रक्रिया केंद्रही उभारले जाणार आहे. नागपूर व परिसराच्या कृषी क्षेत्रातील विशेष शेतमाल ज्या बाजारपेठेत मिळत नाही त्या ठिकाणी हा कृषी माल विकण्यासाठी हे केंद्र चालना देईल. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन एकाच छताखाली सर्व माहिती आणि मदत या केंद्रामार्फत करण्यात येईल अशी माहिती टाटा टेक्नोलॉजीचे संचालक सुशिल कुमार यांनी दिली. या बैठकीला हर्षवर्धन गुणे आणि अरुण खोब्रागडे उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार