सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम काळाची गरज - डॉ. नितीन राऊत.*

व्होकेशनल टिचर्स असोसिएशन (विटा) व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने “शिक्षकांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना "ऑनलाईन कार्य कसे व केव्हा” या विषयावर वेबिनाराचे आयोजन करण्यात आले होते.

Snehal Joshi
  • Jul 24 2020 11:22PM
व्होकेशनल टिचर्स असोसिएशन (विटा) व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने “शिक्षकांनी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना "ऑनलाईन कार्य कसे व केव्हा” या विषयावर वेबिनाराचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे उर्जा मंत्री व नागपूर जिल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत बोलत होते की आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्य व्यवसाय शिक्षण प्राप्त विद्यार्थी हाच स्पर्धेत टिकून राहू शकतो. आजच्या पारंपारिक शिक्षणात कौशल्य शिक्षण हे पूर्णत: प्रात्यक्षिक स्वरूपाचे असते. या अभ्याक्रमामधील विद्यार्थी हा उद्योजक म्हणून स्वावलंबीपणे पुढे येत आहेत. डॉ. राऊत पुढे म्हणाले कि, कोणत्याही विद्या शाखेत विद्यार्थी हा केंद्र बिंदू असतो. अशात वेबिनारच्या माध्यमातून प्रभावी ऑनलाईन प्रशिक्षणाचे ज्ञानार्जन घरबसल्या देण्याकरिता शिक्षकांना पुढाकार द्यावा व गोरगरीब, वंचित सामाजीक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या मुख्य प्रवाहात आणावे. एच.एस.सी. व्होकेशनल अभ्यासक्रम महाराष्ट्रात मोठया बळकटीने पूढे येत आहे. हा अभ्यासक्रम स्वयं-रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणारा ठरला आहे. ‘विटा’ चे सहसंचालक पी.टी. देवतळे म्हणाले की, ऑनलाईन शिक्षण आज गरजेचे ठरत आहे. कोविड-१९ हया काळात शिक्षण आपल्या दारी, या संकल्पना ऑनलाईनच्या माध्यमातून पुढे येताना दिसत आहेत. नागपूर विभागातील उमेश खारोडे, सुधा ठोंबरे, सुशिल भुजाडे, या तिनही जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी वर्गाला या वेळेस वेबिनाद्वारे मार्गदर्शन केले. या वेबिनारचे प्रास्ताविक 'विटा' चे राज्य कार्याध्यक्ष व मुख्य आयोजक डॉ. जयंत जांभूळकर, सुत्रसंचालन स्वाती हिरवाडे व अंजली वडोदकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजय पन्नासे यांनी केले. या वेबिनरच्या आयोजनाकरिता “विटा” चे पदाधिकारी सुदिप रांचलवार, संजय तिजारे, रोशन नासरे, अनुराग कनोजिया, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा. संचालक एस. एस. कुळकर्णी, निरिक्षक आर. पी. मेहेंदळे इत्यादी आयोजकांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार