सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*बारीक मध्ये केलेल्या वीज कंपन्यांवरच्या नियुक्त्या जाहीरपणे रद्द*

वीज कंपन्यांवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Snehal Joshi .
  • Jul 23 2020 4:44PM
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सरकार मधील आपले सहकारी पक्ष शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी चर्चा न करता संबंधित पारेषण आणि निर्मिती कंपन्यांमध्ये संचालक मंडळावर अशासकीय नेमणूक केल्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नव्याने मतभेदाची लाट दिसून येते राऊत यांनी परस्पर या सर्व प्रशासकीय नियुक्ती केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे नेते नाराज होते. याबाबत काही जणांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली होती. यानंतर वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या सरकारकडून रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते. राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या नियुक्तीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आसीम गुप्ता यांनी मंजुरी दिली नव्हती. परंतु, कोरोना झाल्यामुळे काही दिवस आसीम गुप्ता सुट्टीवर गेले होते. त्यावेळी हंगामी पदभार सांभाळणाऱ्या दिनेश वाघमारे यांच्याकडून राऊत यांनी १६ सदस्यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळवून घेतली होती, असे समजते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार