सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्य अभियंत्यांच्या काव्यसंग्रहाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंता असणारे विवेक पांडुरंग रोकडे यांच्या 'ऊर्जाफुले' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले.

Snehal Joshi .
  • Dec 28 2020 2:33PM
राज्याच्या वीज निर्मिती कंपनीत भुसावळ येथे मुख्य अभियंता असणारे विवेक पांडुरंग रोकडे यांच्या 'ऊर्जाफुले' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. बेझनबाग येथील निवासस्थानी हा छोटेखानी प्रकाशन सोहळा पार पडला. पालकमंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी श्री. रोकडे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक केले. ऊर्जा विभागात मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना सुद्धा त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेला या पुस्तकाच्या माध्यमातून न्याय दिल्याची प्रशंसा त्यांनी केली. निसर्ग व मानवी मनाच्या संवेदना व्यक्त करणाऱ्या या काव्यसंग्रहाला 'ऊर्जाफुले' हे समर्पक नाव रोकडे यांनी दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्यातील कलागुणांना जपावेत, असेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच ऊर्जा विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार