सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गरजू कोव्हीड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे - पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे - पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

Sudarshan MH
  • Apr 20 2021 5:20PM
 
पालघर - ( मनीष गुप्ता ) पालघर गरजू कोव्हीड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन चा पुरवठा तातडीने उपलब्ध करावा असे निर्देश कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. असे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. वसई विरार महापालिका येथे जिल्ह्यातील कोव्हीड बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते यावेळी खासदार. राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ. वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त डी. गंगाथरण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा बैठकीत दिल्या.
 
जिल्ह्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे लवकरच रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त . जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा श्री भुसे यांनी घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार