सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण विद्यावेतन ४ हजार रुपये वाढ

राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रति केंद्र १० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते.

Snehal Joshi .
  • Oct 7 2020 10:27PM
अल्पसंख्याक समाजाचे शासकीय सेवेतील प्रमाण वाढावे याकरिता राबविण्यात येत असलेल्या युपीएससी स्पर्धापूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. राज्य प्रशासकीय संस्थेच्या मुंबई, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रति केंद्र १० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थ्यांना सध्या प्रती महिना २ हजार रुपये इतके विद्यावेतन देण्यात येते. तथापि, उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात प्रती महिना २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री  मलिक यांनी सांगितले. विद्यावेतनातील ही वाढ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येत आहे. मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था तसेच नागपूर, औरंगाबाद व कोल्हापूर येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र येथे विद्यार्थ्यांना युपीएससीच्या तयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते. अल्पसंख्याक समाजातील होतकरु विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार