*प्रतिनिधी किरण मुक्कावार 9767271001*
उमरखेड शहरातील प्रमुख मार्गावर रस्त्याच्या कडेला बसलेल्या लहान व्यवसाईकांना उन्हाळ्यात उन्हापासून पासून संरक्षण होऊन स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी गोदावरी अर्बन बँकेच्या वतीने निःशुल्क छत्रीचे वाटप करण्यात आले अनेक छोट्या व्यवसायिकांना उन्हापासून त्रास होतो त्यासाठी गोदावरी अर्बन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री धनंजय क्षिरसागर सहाय्यक अधीक्षक राहुल देशमुख लिपिक रितेश गिरी सेवक निखिल शुक्ला यांनी छत्रीचे वाटप केले त्यामुळे छोटा व्यवसाईका मध्ये गोदावरी अर्बन बद्दल जिव्हाळा निर्माण झाला व त्यांनी बँकेचे धन्यवाद मानले.
गोदावरी अर्बन शाखा उमरखेड ही सामाजिक उपक्रमात सदैव अग्रेसर असते