सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महिला बचत गटातील "एक सदस्य एक वृक्ष" अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमे निमित्त जिल्ह्यात बचतगट महिलांकडून 1 हजार वडाच्या झाडाचे वृक्षारोपण

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रभावी चळवळ उभी असून गटातील महिलांच्या मार्फत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत

s.ranjankar
  • Jun 25 2021 1:32PM


लातूर,दि.24  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रभावी चळवळ उभी असून गटातील महिलांच्या मार्फत  जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. उमेद बचत गटांच्या महिला या केवळ बचत करणे,कर्जघेणे व यातून उपजिविका निर्माण करणे यावरच न थांबता  अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात पण  अग्रेसर आहेत.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने    महिला बचत गटातील " एक सदस्य एक वृक्ष " लागवड करून 15 जून ते 30 जून 2021 या कालावधीत वृक्ष पंधरवाडा आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाला बचत गटातील महिलांनी उत्सर्फूत प्रतिसाद देत आज पर्यंत  एकूण 34 हजार 203  वृक्षारोपण केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या निमित्ताने आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून भारतीय महिला वटवृक्षांची मनोभावे पूजा करतात याच दिनी सर्व महिलांनी एक सामाजिक बांधिलकी ठेऊन व निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो ही प्रामाणिक भावना ठेवून जिल्ह्यातील उमेद गटातील महिलांनी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी  " एक सदस्य एक वृक्ष "

  या अभियान अंतर्गत  वडाचे ही झाड लावावे असे मुख्यकार्यकारी अधिकरी अभिनव गोयल व प्रकल्प संचालक  संतोष जोशी यांनी संयुक्त केले आहे. 
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष जोशी, यांच्या मार्गदशर्नाखाली, उमेद अभियान, सामाजिक वनीकरण विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वटसावित्री पौर्णिमे निमित्त  तालुका लातूर येथील  खुलगापुर, कोळपा, ता. चाकुर  येथील आष्टा व  लिंबाळा ता. औसा  येथे  व जिल्हयात एकूण 1000 वडाच्या वृक्षांची लागवड  करण्यात आली. यामध्ये गटातील महिला नी उत्सर्फूत सहभाग घेतला असून  वृक्ष संवर्धन करण्यासाठी महिलांनी झाडे दत्तक घेण्याचा संकल्प या निमितीने केला आहे. यासाठी  जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, अनिता माने, वैभव गुराळे, मिलिंद आंबेकर,  महादेव शेळके, श्रीमती. रेणु गायकवाड, श्रीमती. गीताश्री माने,व सर्व तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार