सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*उमरखेड शहरात बुधवार पासुन दहा दिवस "जनता कर्फ्यू "*

उमरखेड शहरात व तालुक्यातील कोरोना संसर्ग व रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे

Sudarshan MH
  • Apr 18 2021 5:55PM
         *प्रतिनिधी किरण मुक्कावार*
उमरखेड शहरात व तालुक्यातील कोरोना संसर्ग व रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याचे पाहता उमरखेड येथील व्यापारी संघ, किराणा दुकानदार संघ, कापड व्यापारी संघ, कृषीकेंद्र चालक संघ, सुवर्णकार संघटना, याशिवाय ईतर संघटना, पत्रकार बांधव, शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी यांनी आज रविवार दिनांक 18.04.2021 रोजी उपविभागीय अधिकारी श्री. स्वप्नील कापडणीस साहेब, यांची भेट घेऊन शहरात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता, तसेच कोरोनाची साखळी तोडण्याकरिता पुढील कमीतकमी 10 दिवस "जनता कर्फ्यू " लावून कडक लॉकडाऊन करावा अशी विनंती केली असुन त्यानुसार उपविभागीय अधिकारी श्री. स्वप्नील कापडणीस साहेब, यांनी ताबडतोब सभेचे आयोजन करून बुधवार दिनांक 21.04.2021 ते शुक्रवार दिनांक 30.04.2021 पर्यंत उमरखेड शहरात कडक "जनता कर्फ्यू" चे निर्देश दिले आहेत.
सदर सभेकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वालचंद मुंडे, श्री. गोपाल अग्रवाल, रोटरी क्लब तर्फे श्री. सुरेंद्र कोडगिरवार, सामाजिक संस्थेचे श्री. दिपक ठाकरे, व्यापारी संघटनेचे श्री. बाळुशेठ भट्टड, श्री. वैभव कोडगिरवार, डॉ. आशिष साकळे, श्री. विजय भुतडा, श्री. प्रकाश आर्य, श्री. दर्शन भंडारी, श्री. गणेश कऱ्हाळे, श्री. वसीमभाई, रौफभाई, श्री. सचिन घाडगे, श्री. पुंडलिक कुबडे, श्री. मनोज माहेश्वरी, श्री.प्रमोद देशमुख, श्री. भगवान अग्रवाल, श्री. सतीश श्रीरामजवार, श्री. प्रदिप पत्तेवार, पत्रकार श्री. अशोक गांजेगावकर, श्री. दत्तात्रय देशमुख, श्री. बाळासाहेब ओझलवार, तलाठी श्री. दत्तात्रय दुर्केवार ई. हजर होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार