सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी गुटखा माफियाच्या आवळल्या मुसक्या 243600 रुपयाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त

महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा खुलेआम विकत असल्यामुळे गोपनीय माहितीच्या आधारे उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वालचंद मुंडे यांच्या कर्तव्यदक्ष कार्यामुळे 243600 रुपयाच्या मुद्देमालासह गुटखा पकडून आरोपीला अटक

Sudarshan MH
  • Feb 26 2021 4:07PM
उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे यांनी गुटखा माफियाच्या आवळल्या मुसक्या 243600 रुपयाच्या मुद्देमालासह  गुटखा जप्त..
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा खुलेआम विकत असल्यामुळे गोपनीय माहितीच्या आधारे उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वालचंद मुंडे यांच्या कर्तव्यदक्ष कार्यामुळे 243600 रुपयाच्या मुद्देमालासह  गुटखा पकडून आरोपीला अटक करण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलीसअधिकारी वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल  राजू तिजारे, सुनील केंद्रे, युनूस भातनासे, रवी चव्हाण, व राठोड यांनी केली सदर आरोपी हा हिमायतनगर येथून बंदी असलेला सुगंधित गुटका अवैधरित्या वाहतूक करून विक्रीकरिता घेऊन जात असताना गोपनीय च्या आधारे चालगणी येथील हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी करून पकडण्यात आला
आरोपी भुजंग बालाजी कदम वय 24 वर्ष राहणार रुई तालुका हदगाव जिल्हा नांदेड याला आणि पांडुरंग श्रीराम वच्चेवार वय 35 वर्षे राहणार भानेगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांना अटक केली असून त्यांच्यावर कलम 188, 269, 272, 273, 328, 34 भा द वि अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच अब्दुल मलिक अब्दुल हनीफ राहणार हिमायतनगर जिल्हा नांदेड यांचे विरुद्ध कलम 109 भा द वि प्रमाणे गुन्हा नोंद होणे बाबत पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी किरण मुक्कावार उमरखेड जिल्हा यवतमाळ

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार