सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार*

उमरखेड /प्रतिनिधी: *किरण मुक्कावार* *9767271001* उमरखेड शहरातील साणकवाडी येथील आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला नामक नराधमाने एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिनांक 8 मे रोजी लैंगिक अत्याचार केले असून ही घटना काल दिनांक 24 रोजी उघडकीस आली.

Sudarshan MH
  • May 28 2021 11:01AM

*आरोपी फरार; पोक्सो दाखल*

 उमरखेड /प्रतिनिधी:   *किरण मुक्कावार* *9767271001* उमरखेड शहरातील साणकवाडी येथील आरोपी शेख नजीर शेख उस्मान दौला नामक नराधमाने एका पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर दिनांक 8  मे रोजी लैंगिक अत्याचार  केले असून ही घटना काल दिनांक 24 रोजी उघडकीस आली. 
    सविस्तर वृत्त असे की,  दिनांक 8 मे रोजी पीडित मुलगी वय वर्षे पाच ही  दूध आणण्याकरिता आरोपीच्या कोठ्यामध्ये गेली असतात  आरोपी नामे शेख नजीर शेख उस्मान दौला वय वर्षे 50 याने  मुलीसोबत गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. काही दिवसानंतर एका व्हिडीओ क्लिप मुळे  हा प्रकार उघडकीस आला. सदर क्लिप बघून पीडित मुलीच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेत हकीकत सांगितली. सदर फिर्यादीचा रिपोर्ट वरून ताबडतोब गुन्हा नोंद करून पोलीस आरोपीच्या घरी गेले असता आरोपी हा फरार झाला होता. 
  आरोपींविरुद्ध 376 अ ब भादंवी सह 4, 8 पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा फरार आहे. याकरिता आरोपीला शोधण्यासाठी पथक नेमण्यात आले असून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री वालचंद मुंडे, श्री आनंद वागतकर सपोनि संदीप गाडे पुढील तपास करीत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार