सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*कामगारांना काम न मिळाल्यास १५ दिवसांचा पगार देणार.*

अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनासोबत येथील कार्यरत अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघाने दोनदा प्रदीर्घ चर्चा करून कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मध्यस्थीने बी.एस.आर. ठेकेदारी कामगारांना पूर्ववत काम द्यावे अन्यथा काम न दिल्यास कमीत कमी १५ दिवसांचा पगार द्यावा.

Snehal Joshi
  • Jul 13 2020 12:41AM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात संचारबंदी केल्यामुळे अल्ट्राटेक सिमेंट कंपनी २४ मार्च पासून पूर्णतः बंद होती. शासकीय परवानगीनंतर कंपनीचे काम एक महिन्यानंतर टप्या-टप्याने सुरू झाले. पुढे १ जूनपासून कंपनी नियमित सुरू झाली. ३१ मे पर्यंतचा संचारबंदी काळातील पगाराबद्दल अल्ट्राटेक कामगार संघटनेने मध्यस्थी करून २०१९ च्या एप्रिल व मे महिन्याच्या पगाराची सरासरी काढून सर्वच ठेकेदारी कामगारांना एप्रिल व मे २०२० महिन्याच्या पगार देण्यात आला. जून महिन्यात कंपनीचे काम सुरु झाले, परंतु कामावरील बी.एस.आर. ठेकेदारी कामगारांना सुरळीत काम न मिळाल्यामुळे व कंपनीने प्रत्यक्ष हजेरीचाच पगार दिल्यामुळे बऱ्याच कामगारांना २-४ दिवसांच्या अल्प पगारात समाधान मानण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. ह्याच अडचणीला प्रथम प्राधान्य देऊन अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापनासोबत येथील कार्यरत अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघाने दोनदा प्रदीर्घ चर्चा करून कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मध्यस्थीने बी.एस.आर. ठेकेदारी कामगारांना पूर्ववत काम द्यावे अन्यथा काम न दिल्यास कमीत कमी १५ दिवसांचा पगार द्यावा व जून महिन्याचा झालेला पगार सुद्धा कमीत कमी १५ दिवसाचा द्यावा व जोपर्यंत परिस्थिती सुरळीत होणार नाही तोपर्यंत हा निर्णय लागू राहील असा करार करण्यात आला. बी.एस.आर. ठेकेदारी कामगारांना जास्तीत जास्त हजेरी मिळावी याकरिता सप्लाय कामगारातील निवृत्त किंवा रिक्त झालेल्या जागेवर बी.एस.आर. कामगारांना सामावून घेण्याबद्दल दीर्घ चर्चा करून पुढे मार्ग काढण्याचे मंजूर झाले आहे. वरील चर्चेत कंपनीकडून युनिट हेड विजय एकरे, अनिल पिल्लई, पाठक तसेच कामगार संघाकडून कर्याध्यक्ष शिवचंद्र काळे, नंदकिशोर बिलारिया, एम. एस. चंदेल, नरेंद्र पांडे, गजानन बोढेकर, शामसुंदर रेड्डी व भिवगळे यांची उपस्थिती होती. ९ जुलैला करण्यात आलेल्या कराराची सर्वांना माहिती देण्यात आली. बहुसंख्य कामगारांनी आनंद व्यक्त करून व्यवस्थापन व कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांचे आभार मानले. कामगार संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर येथे जो करार करण्यात आला अशा पद्धतीचा करार आतापर्यंत भारतभरातील अल्ट्राटेकचा‌ कोणत्याही सिमेंट कंपनीत झाला नाही. ही आमच्या कामगार संघटनेसाठी अभिमाना ची बाब आहे.असे शिवचंद्र काळे कार्याध्यक्ष, अल्ट्राटेक सिमेंट कामगार संघ यांनी म्हटले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार