सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोणताही भाविक मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत व अशुद्ध दूध वाहणार नाही --सर्वोच्च न्यायालय

उज्जैन येथील महाकालेश्वर येथील शिवलिंगाचे संवर्धन व्हायलाच हवे. शिललिंगाचा अभिषेक अशुद्ध दुधाने केला जाऊ नये. फक्त शुद्ध दुधाचाच वापर व्हावा आणि मंदिर प्रशासन समितीने शुद्ध दुधाची व्यवस्था करावी,

Snehal Joshi .
  • Sep 3 2020 11:32PM
उज्जैन येथील महाकालेश्वर येथील शिवलिंगाचे संवर्धन व्हायलाच हवे. शिललिंगाचा अभिषेक अशुद्ध दुधाने केला जाऊ नये. फक्त शुद्ध दुधाचाच वापर व्हावा आणि मंदिर प्रशासन समितीने शुद्ध दुधाची व्यवस्था करावी, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.  न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय न्यायालयाने हा निकाल देताना, शिवलिंगाची कुठल्याही प्रकारे झीज होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश मंदिर प्रशासनाला दिले.  कोणताही भाविक मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत वाहणार नाही. शुद्ध दुधानेच पूजा करतील. मंदिर समितीने भाविकांकरिता शुद्ध दुधाची व्यवस्था करावी. कुणीही शिवलिंगवर अशुद्ध दूध वाहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. भस्म आरतीत अधिक सुधारणा करावी, ज्यामुळे शिवलिंगाचे संवर्धन होईल. यासाठी सर्वोत्तम पद्धतीचा वापर करावा. शिवलिंगवरील मुंड माळांचे ओझे कमी करावे. धातूचे मुंड गरजेचे आहे का, याचा विचार करा. गर्भगृहातील पूजा स्थळाचे 24 तास रेकॉर्डिंग केले जाईल आणि ते सहा महिनेपर्यंत जतन केले जाईल. कोणत्याही पुजार्याने आदेशाचे उल्लंघन केल्यास, मंदिर समिती त्याच्यावर कारवाई करू शकते, असेही न्यायालयाने सांगितले.  न्या. अरुण मिश्रा यांचा निवृत्तिपूर्वीचा हा शेवटचा निकाल होता. आपला निरोप समारंभ आयोजित करू नये आणि केल्यास मी सहभागी होणार नाही. कोरोना संकटात अशा प्रकारे निरोप समारंभ आयोजित करण्यास आपला विवेक परवानगी देत नाही, असे न्या. मिश्रा म्हणाले.  महादेवाच्या कृपेने हा शेवटचा निकालही झाला, असे न्या. मिश्रा यांनी हा निकाल दिल्यानंतर आपल्या न्यायासनातील उतर न्यायमूर्तींना सांगितले. या निर्णयामुळे न्या. मिश्रा यांच्या चेहर्यावर आत्मसंतुष्टी दिसत होती.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार