सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘विश्वशांती महोत्सवा’ चे अभूतपूर्व स्वागत

साता समुद्रापार बे एरिया, कॅलिफोर्निया येथे श्री स्वामी समर्थ केंद्राचे लोकार्पण

Shruti Patil
  • Apr 23 2024 2:48PM

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठा तर्फे “यूएसए आणि कॅनडा विश्वशांती महोत्सव २०२४” चे आयोजन दि. १३ ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीत परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादानेआणि गुरुपुत्र आदरणीय श्री नितिनभाऊंच्या प्रमुख उपस्थितीत- जागतिक शांतता आणि मानवतेच्या उन्नतीसाठी यूएसए आणि कॅनडा मधील विविध ठिकाणी- लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया), कोलंबस (ओहायो), रॅले (नॉर्थ कॅरोलिना), ओरलँडो (फ्लोरिडा), मेम्फिस (टेनेसी), सिएटल (वॉशिंग्टन), बे एरिया (कॅलिफोर्निया), टोरंटो (कॅनडा) येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला अमेरिकेमधील रहिवासी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते. अमेरिका आणि कॅनडा मधील अनेक मान्यवर- स्टेट हाऊसचे प्रतिनिधी, परिषदांचे सदस्य, शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, विविध कॉर्पोरेट गटांचे कंट्री हेड, मंदिराचे ट्रस्टी इत्यादींनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमांना हजेरी लावली. 

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या ‘देश विदेश अभियान’ विभागाने आयोजन केलेल्या या कार्यक्रमांमध्ये सेवा मार्गाच्या बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वामी जप, स्तोत्र-मंत्रांचे पठण, मन:शांती साठी- ध्यान, ढोल ताशाच्या गजरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक, भारतीय संस्कृती चे स्टॉल्सच्या माध्यमातून प्रदर्शन- असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमादरम्यान स्वामी भक्तांची स्वयं-शिस्त आणि विदेशात राहून देखील श्री स्वामी समर्थ सेवा मार्गा साठीचे समर्पण हे वाखाणन्याजोगे होते.

कॅनडातून प्रारंभ करून अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये १० दिवस सुरू असलेल्या ‘विश्वशांती महोत्सवा’ ची सांगता बे एरिया (कॅलिफोर्निया) येथे २१ एप्रिल २०२४ रोजी अभूतपूर्व अश्या सत्संगाने झाली. या समारंभात आदरणीय नितिनभाऊंच्या करकमलाने अमेरिकेतील पहिले श्री स्वामी समर्थ केंद्र ट्रेसी, बे एरिया, कॅलिफोर्निया येथे लोकार्पण करण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सातासमुद्रा पार वाटचालीची सुरुवात या ऐतेहासिक अश्या अमेरिकेतील पहिल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राने झाली आणि सर्वच मंत्रमुग्ध झाले. आदरणीय नितिनभाऊंनी स्वामी भक्तांना बहुमुल्य आध्यात्मिक मार्गदर्शन केले नवीन सेवा केंद्रासाठी शुभेच्छा दिल्या. जगभरात सेवा मार्ग करत असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल आदरणीय नितीनभाऊंनी सर्व स्वामी भक्तांना अवगत केले आणि विश्वशांती साठी सेवा मार्गाचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन केले. त्याआधी कार्यक्रम स्थळी विश्वशांती यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र मंडळ बे एरिया चे अध्यक्ष भास्कर रानडे, आणि बीएमएम चे वसुधा पटवर्धन व विराज राऊत महोत्सवात आवर्जून उपस्थित होते. महोत्सवाच्या आयोजना साठी विविध संस्थानी हातभार लावला. 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित भाविकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विनामूल्य आध्यात्मिक समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ओहायो राज्याची राजधानी कोलंबस येथिल कार्यक्रमाला श्री. स्टीवन राइस- ख्रिचन लूथरन मंत्री आणि श्रीमती पैट्रीशिया-प्रसिद्ध चिल्ड्रेनबर्थ एक्स्पर्ट व लैक्टेशन एजुकेटर, यांनी भाग घेतला आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ गुरूपीठाच्या माध्यमातून विश्वशांती साठी सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची प्रशंसा केली. 

सेवा मार्गाच्या आजवरचा अमेरिका आणि कॅनडातील सर्वात मोठा व ऐतिहासिक अश्या या कार्यक्रमात टोरांटो (कॅनडा) येथे श्री. जेफ लाल- संसद सदस्य, कंजर्वेटिव पार्टी, प्रेसिडेंट जेनको कॅनडा इंकारपोरेशन व भारत माता मंदिर ब्रैम्पटन चे संस्थापक ट्रस्टी तसेच मुरलीधर थपलियाल- थपलियाल व राय लॉ फर्म चे संस्थापक व इंडो-कॅनडा चैंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष आवर्जुन उपस्थित होते. लॉस एंजिल्स, कैलिफोर्निया येथे श्री. विजय पाटील- शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार फाउंडेशन चे अध्यक्ष, श्री. प्रमोद वैटी- अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ लॉस एंजिल्स, श्री यश जोग- खजिनदार महाराष्ट्र मंडळ लॉस एंजिल्स हे उपस्थित होते. हिंदू सोसायटी ऑफ नॉर्थ कैरोलिना (एचएसएनसी) मंदिरा चे अध्यक्ष श्री. ललित महादेश्वर हे रॅले, नॉर्थ कैरोलिना येथील महोत्सवात भक्तिपूर्वक सहभागी झाले. सर्वच मान्यवरांनी ‘श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने’- यूएसए आणि कॅनडा मध्ये नियमितपणे असे कार्यक्रम आयोजित करण्याची विनंती केली.

या कार्यक्रमात बालसंस्कार विभागाच्या विद्यार्थ्यांचे विश्वशांती चा संदेश देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून सुरु असलेले उदात्त सामाजिक कार्य, बालसंस्कार, गर्भसंस्कार, शिशू संस्कार, सुजाण पालकत्व,  युवाप्रबोधन, वेद-विज्ञान संशोधन, ग्रंथ-साहित्य, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, पर्यावरण-विज्ञान, भारतीय संस्कृती, विवाह संस्कार इत्यादी विविध सेवा मार्गाच्या स्टॉल्सचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. महोत्सवात अनेक स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुका पूजन करुन आशीर्वाद घेतले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार