सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोन महिलांच्या गर्भाशय पिशवीतिल दुर्मीळ गाठींची जटील शस्त्रक्रिया यशस्वी

एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची कामगीरी

s.ranjankar
  • Aug 19 2021 1:22PM

 

 

 

लातूर, दि. 17 – एका 40 आणि 56 वर्षीय अशा दोन महिलांच्या पोटातील गर्भाशय पिशवीत वाढलेल्या दुर्मीळ गाठींवर (Broad ligament fibroid) एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन महिलेच्या पोटातून प्रत्येकी दीड व दोन किलोंचा मासांचा गोळा यशस्वीपणे बाहेर काढला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांनी शिताफीने जटील शस्त्रक्रिया यशस्वी करुन दोन्ही महिलांना जीवदान दिले आहे.

महादेवी फुलचंद धुमाळ (वय 40 वर्ष, रा. सामनगाव ता. लातूर) व मुंमताज मोहीयोद्दीन शेख (वय 56 वर्ष, रा. कोळपा, ता. लातूर) या दोन्ही महिलांना गेल्या काही वर्षापासून पोटदुखीचा त्रास होत होता. दरम्यान त्यांची येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट यांनी प्राथमिक तपासणी केली असता या महिला रुग्णांच्या पोटात गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्यांना रुग्णालयात दाखल करुन त्यांच्या पोटाची सोनोग्राफी व सिटीस्कॅन केला असता गर्भाशय पिशवीत मोठी गाठ असल्याचे निदान झाले. अशा प्रकारची गाठ अधिक काळ पोटात राहाणे धोक्याचे असल्याने नातेवाईकांना आजाराबद्दल माहिती देवून डॉक्टरांनी सदरील महिलांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. क्रांती केंद्रे-सिरसाट, डॉ. आरती माने-ढोबळे यांनी महादेवी धुमाळ यांच्या पोटाची शास्त्रक्रिया करुन गर्भाशय पिशवीला असलेली दिड किलोंची मासांची गाठ शस्त्रक्रियेव्दारे यशस्वीपणे बाहेर काढली तर मुंमताज शेख यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करुन त्यांच्या गर्भाशयात वाढलेली व अतड्यांना चिकटलेली दोन किलोंची मासांची गाठ शस्त्रक्रिया करुन शिताफीने बाहेर काढली. या शस्त्रक्रियेसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रिती कांबळे, डॉ. चेतन सावरीकर, डॉ. रोशनी अकुसकर यांनी सहाय्य केले. तर भूल तज्ज्ञ म्हणून डॉ. टी. के. कारंडे, डॉ. भगवान पाटील, डॉ. संजय बेंबडे, डॉ. राजेश कवळास यांनी काम पाहिले व परिचारीका म्हणून सावित्रा बदणे, सुषमा देवकते यांनी सेवा बजावली. काही दिवसांच्या उपचारानंतर नुकतीच या दोन्ही महिला रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून शस्त्रक्रियेपुर्वी होत असलेला त्रासही कमी झालेला आहे.

सर्वसाधारणपणे हार्मोन्सचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने अनेक महिला रुग्णांच्या गर्भाशयात गाठ (Fibroid Uterus) अढळते. परंतू त्यातले-त्यात वरील दोन्ही महिला रुग्णांच्या गर्भाशय पिशवीत निघालेली गाठ ही क्वचित रुग्णांमध्ये दिसून येते. अशा गाठींची शस्त्रक्रिया करताना मुत्राशय पिशवी, मुत्र नलिका, लहान आतडे यांना इजा होण्याची शक्यता असते. गर्भाशय पिशवीत वाढलेल्या गाठीकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने या गाठीचे कर्करोगात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे पोटात गाठ असल्याचे निदान झाल्यास अथवा तशी लक्षणे दिसून आल्यास महिलांनी दुर्लक्ष न करता तात्काळ उचार घ्यावेत असे आवाहन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ कांती केंद्रे-सिरसाट यांनी केले आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार