सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

चोरी गेलेल्या चार दुचाकींसह दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात..

बुलढाणा : गत काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील काही दुचाकी चोरी होण्याचे सत्र वाढले असतांना

Sudarshan MH
  • Dec 25 2020 6:11PM
(योगेश शर्मा)
बुलढाणा : गत काही दिवसांपूर्वी चिखली शहरातील काही दुचाकी चोरी होण्याचे सत्र वाढले असतांना यामुळे शहरात दुचाकी धारकांच्या मनात चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तर या अट्टल चोरांच्या कारनाम्यामूळे स्थानिक पोलिस ही वैतागले होते. अश्यातच चिखली पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे हेड कॉन्स्टेबल शशिकांत धारकरी यांनी केलेल्या या वाहन चोरीच्या तापासाअंती चोरी गेलेल्या चार दुचाकींसह दोन अट्टल चोरांना अटक करण्यात यश आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन चिखली अंतर्गत येथे अपराध क्रमांक ५२१/२० कलम ३७९ भांदवी मध्ये फिर्यादी महेश अरविंद कठाले, रा. गांधीनगर चिखली अधिक दोन व्यक्तींच्या एक स्कुटी, युनिकोन, होंडा स्प्लेनडर ह्या तीन मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याबाबतची तक्रार दिनांक १२ ऑगष्ट २०२० रोजी चिखली पोलिस स्टेशन येथे दाखल होती. संबंधित या चोरी गेलेल्या वाहनांचा तपास हेड कॉन्स्टेबल शशिकांत धारकरी यांच्याकडे देण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना अमरावती येथे सदर मोटारसायकली असल्याबाबत ची माहिती प्राप्त झाल्यानंतर चिखली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. शशिकांत धारकरी, ना.पो.कॉ. रणजित हिवाळे, पो.कॉ. संदीप सोनुने, युवराज राठोड यांनी सदर गुन्ह्यातील मुद्स्सीर खान मोहम्मद युनूस, वय २२ वर्ष, रा. तारफैल, अकोला आणि समीर खान मेहमूद खान, वय २४ वर्ष, रा. अलकबिर नगर, यवतमाळ असे दोन आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून चार दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. तसेच सदर आरोपींकडून अजून काही माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली असून दोन्हीही आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर सुद्धा मिळालेला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार